Sharad Pawar group banner against ajit pawar and eknath shinde sarkarnama
पुणे

Pune News : 'ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण...', शिंदे अन् पवारांविरोधात बॅनरबाजी

Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Sudesh Mitkar

केंद्रीय निवडणूक आयोगानं मंगळवारी ( 6 फेब्रुवारी ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार ( Ajit Pawar ) गटाला देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं. पण, अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुण्यात बुधवारी ( 7 फेब्रुवारी ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवारांच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. तसेच, पक्ष कार्यालयावर अजित पवारांच्या नावाची असलेली कोनशिलाही कार्यकर्त्यांनी हातोड्याच्या सहाय्यानं तोडलेली. यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.

अशातच गुरूवारी ( 8 फेब्रुवारी ) पुण्यातील दांडेकर पूल परिसरात शरद पवार गटातील संदीप शशिकांत काळे यांनी एक बॅनर लावलं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो लावण्यात आले होते. त्याखाली, 'ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला,' ही म्हण लिहिण्यात आली होती. तसेच, 'पक्षचोर' असंही ठळक अक्षरात लिहिण्यात आलं होतं.

हे बॅनर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता असल्यानं पोलिस प्रशासनानं तातडीनं हे बॅनर हटवलं आहे.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्ह बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगानं निर्णय घेतला. शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना निवडणूक आयोगानं दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटातील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवारांना लक्ष्य करून भाजपवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न शरद पवार गटातील कार्यकर्ते करत असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT