Amol Kolhe-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Shirur Loksabha : अजितदादांच्या मनात नेमकं चाललंय काय? कोल्हेंचा पराभव करणारा शिरूरमधील उमेदवार कोण?

Shivsena-Ncp News : शिरुर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे तयार; मात्र शिवसेना की राष्ट्रवादीकडून लढणार हे गुलदस्त्यात आहे

Uttam Kute

Loksabha Election 2024 : शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव आघाडीचे उमेदवार म्हणून नक्की झाले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून या मतदारसंघात तीनवेळा खासदार राहिलेले शिंदे शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे नाव युतीकडून घेतले जात आहे. (Mahayuti News)

दरम्यान, आढळरावांची पुणे म्हाडाच्या अध्यक्ष तथा सभापतिपदी नुकतीच (ता. १६ फेब्रुवारी) नेमणूक झाल्याने शिरूरमधील युतीच्या उमेदवाराची चुरस आणि उत्कंठा आणखी वाढली आहे. आढळरावांचा पत्ता कट करण्यासाठी त्यांना ही नवी जबाबदारी दिल्याची चर्चा या मतदारसंघात रंगली आहे. आढळरावांनी त्याचा तातडीने इन्कारही केला. आपण महायुतीतकडूनच लढणार असल्याचे सांगितले. पण, शिंदे शिवसेना की अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढणार, हे मात्र त्यांनी गुपितच ठेवले आहे. परिणामी त्यावरूनही चर्चा सुरु झाली आहे. (Ajit Pawar Group News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हे हे शरद पवार यांचे उमेदवार असल्याने त्यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्धीही युतीला तगडाच द्यावा लागणार आहे. त्यात अजित पवारांनी कोल्हेंचा पराभव करण्याचे चॅलेंज दिले असल्याने त्यांच्या मनात नेमका कोण उमेदवार आहे, हे अद्याप कळलेले नाही. आढळराव वगळता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे हेच एकमेव तगडे उमेदवार कोल्हेंना टक्कर देणारे आहेत, पण, ही जागा शिंदे शिवसेनेची आहे. त्यात युतीतील राष्ट्रवादीनेही यावेळी तिथे दावा ठोकल्याने तेथून नक्की लढणार, याची उत्कंठा लागली आहे. त्याजोडीने तेथे आढळरावांनी आपणच युतीचे उमेदवार असणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी २०१९ च्या पराभवानंतर पुन्हा लढण्याची तयारी लगेच सुरु केलेली आहे. (Shivajirao Adhalrao Patil News)

दरम्यान, आढळरावांचा पत्ता कट करण्यासाठी त्यांचे पुनर्वसन म्हणून ही नवी जबाबदारी त्यांना दिली गेल्याच्या सुरु झालेल्या चर्चेमुळे शिरुरला युतीचा उमेदवार आढळराव की अजितदादांच्या मनातील दुसरा कोणीतरी याची उत्कंठा आता आणखी वाढली आहे. तूर्तास कोल्हेंचा पराभव करेल, असा चेहरा महायुतीकडे नाही. त्यामुळे अजितदादा आपली ताकद आढळरावांमागेच उभी करण्याची शक्यता आहे. तसे झाले, तर प्रश्नच मिटणार आहे.

अजितदादांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढण्याचा आग्रह झाला, तर पेच निर्माण होऊ शकतो. पण, त्यांनी आपल्या मनाचा थांगपत्ता अद्याप लागू दिलेला नाही. त्यामुळे शिरूरमध्ये त्यांच्या मनात कोण उमेदवार आहे, हे अद्याप कळलेले नाही. ते आढळरावच की दुसरे कोणी, हे समजण्यासाठी काही दिवस तेथे महायुतीला वाट पहावी लागणार आहे. दुसरीकडे, आपला उमेदवार फिक्स झाल्याने आघाडी निर्धास्त आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT