Shivsena News : 'राऊतांनी जिभेला लगाम घालावा; अन्यथा कोरी करकरीत कोल्हापुरी पाठवू'

Jyoti Waghmare Reply To Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांना आधी वेड लागले होते, आता ते पुरते पिसाळले आहेत.
Sanjay Raut-Jyoti Waghmare
Sanjay Raut-Jyoti WaghmareSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. कोल्हापूर हे गोड गुळाबरोबर कोल्हापुरी चप्पलसाठीही प्रसिद्ध आहे. राऊतांनी आपल्या जिभेला लगाम लावला नाही तर नवी कोरी, करकरीत वाजणारी कोल्हापुरी चप्पल भेट द्यावी लागेल, असा इशारा वाघमारे यांनी दिला आहे. (Shivsena political News)

कोल्हापुरात शिवसेनेच्या महाअधिवेशनाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राहून शिंदे यांना खोटं बोलण्याची सवय लागली आहे. ते वेडे झाले असून त्यांच्यावर इलाज करण्याची गरज आहे, अशी कडवट टीका राऊतांनी केली होती. (Eknath Shinde Party News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut-Jyoti Waghmare
Mahayuti Seats Allotment : नाशिक राष्ट्रवादीकडे; छगन भुजबळ लढवणार लोकसभा?

राऊतांच्या टीकेला प्रा. ज्योती वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, खासदार संजय राऊत यांना आधी वेड लागले होते, आता ते पुरते पिसाळलेले आहेत. महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे. (Sanjay Raut)

संजय राऊत कधी माइकवर थुंकतात, तर रोज माइकवर भुंकतात. पिसाळलेला कुत्रा अंगावर आला की अहो हाडा; म्हणून चालत नाही. तर ‘ए हाड’ असेच म्हणावे लागते. कोल्हापूर हे गुळाबरोबर कोल्हापुरी चप्पलसाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे राऊतांनी जिभेला लगाम लावला नाही, तर नवी कोरी, करकरीत वाजणारी कोल्हापुरी चप्पल त्यांना भेट द्यावी लागेल, असा इशारा ज्योती वाघमारे यांनी दिला.

संजय राऊत काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे नोकर आणि गुलाम झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यामुळे हे लोक असे बोलत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीवेळी अमित शाह हे मातोश्रीवर का आले होते, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. मोदी आणि शाह यांच्याबरोबर राहून त्यांनाही खोट बोलण्याचे व्यसन जडलं आहे. ते गांजा मारून खोटं बोलतात.

Sanjay Raut-Jyoti Waghmare
Indapur Politics : हर्षवर्धन पाटलांच्या लेकीने वाढविले अजितदादांचे टेन्शन; ‘त्यांनी आमची तीनवेळा फसवणूक केलीय’

आम्हाला तडजोड करायची असती, तर तेव्हाच केली असती. आम्ही पळून जाणारे नाही आहोत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही. मोदींना पंतप्रधान करण्याचा आणि भाजपच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनात करता, ही काय लाचारी आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांचा कडेलोट केला असता, असेही राऊत म्हणाले.

ते म्हणाले, हिम्मत असेल तर मुंबई, ठाण्याच्या निवडणुका घ्या, तेव्हा कळेल तर कुणाच्यात जोर आहे. एकना शिंदेंना खोटं बोलण्याची सवय लागली आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, ते वेडे झाले असून त्यांच्यावर इलाज करण्याची गरज आहे.

Sanjay Raut-Jyoti Waghmare
Lok Sabha Election 2024 : अजित पवारांच्या भूमिकेमुळे भारती पवारांचे वाढणार टेन्शन !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com