Vidhan Bhavan Sarkarnama
विशेष

Maharashtra Election Result : विधानसभेची मुदत संपल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागेल का? नेमका इतिहास काय सांगतो?

Maharashtra Vidhan Sabha News : राज्यात गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. शनिवारी मतमोजणीत महायुतीने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यात गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. शनिवारी मतमोजणीत महायुतीने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता राज्यात सत्ता स्थापन करण्याची लगबग सुरु आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे लागले आहे. विधानसभेची मुदत 26 तारखेला संपत असल्याने राज्यात मध्यरात्री 12 नंतर राष्ट्रपती राजवट लागणार का हा प्रश्न सर्वाना सतावत आहे. (Maharashtra Election Result)

या सर्व घटनानात्मक बाबीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच 26 नोंव्हेंबरपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणे किंवा नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणे बंधनकारक नाही. यापूर्वी अनेकदा विधानसभेची मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाले आहेत. त्यामुळे चौदाव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 28 नोव्हेंबर 2019 रोजी झाला. राज्यात सरकार स्थापन होण्यात वेळ त्यामुळेच घेतला जात आहे. 26 तारखेपूर्वीच नवीन सरकार अस्तित्वात आले पाहिजे, असे कोणतेही संवैधानिक बंधन नसल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. राज्यात महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडीत चुरशीची लढत झाली. त्यानंतर आता आणि नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधीचे वेध लागले आहेत. मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ लागली आहे. अशातच मुख्यमंत्री पदासाठी पक्षांमध्येही चुरस आहे. दरम्यान, विद्यमान विधानसभेची मुदत 26 तारखेला संपत असल्याने राज्यात मध्यरात्री 12 नंतर राष्ट्रपती राजवट लागेल, ही धारणा चुकीची असल्याची माहिती आहे.

राज्यात 26 नोव्हेंबरपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणे किंवा नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणे बंधनकारक नाही. यापूर्वी अनेकदा विधानसभेची मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शपथविधी झाले आहेत. त्यामुळे 26 तारखेपूर्वीच नवीन सरकार अस्तित्वात आले पाहिजे, असे कोणतेही संवैधानिक बंधन नसल्याचे समजते.

दहावी विधानसभेची मुदत 19 ऑक्टोबर 2004 रोजी संपली. 11व्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 1 नोव्हेंबर 2004 रोजी झाला होता. अकराव्या विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2009 रोजी संपली. बाराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 7 नोव्हेंबर 2009 रोजी झाला होता.

कोणतेही संवैधानिक बंधन नाही

बाराव्या विधानसभेची मुदत 31 आॅक्टोबर 2024 रोजी संपली. तेराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 8 नोव्हेंबर 2014 रोजी झाला. तेराव्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपली. चौदाव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 28 नोव्हेंबर 2019 रोजी झाला. राज्यात सरकार स्थापन होण्यात वेळ त्यामुळेच घेतला जात आहे. 26 तारखेपूर्वीच नवीन सरकार अस्तित्वात आले पाहिजे, असे कोणतेही संवैधानिक बंधन नाही.

नोटिफिकेशन काढले जाणार

14 व्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्याआधी 15 वी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. यासंदर्भात आता नोटिफिकेशन काढले जाईल. नोटिफिकेशन निघाल्यानंतर संविधानात्मकरित्या 15 वी विधानसभा अस्तित्वात आली, असे मानले जाईल. त्यानंतर महायुतीकडून बहुमताचे आकडे आणि सह्या घेऊन सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा जाईल. त्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून निमंत्रण देण्यात येईल.

सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होणार

या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी रविवारी संध्याकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना आयोगाकडून कळवली जाणार आहे. सोबतच, निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली जाणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडून 15 वी विधानसभा अस्तित्वात आल्याचे नोटिफिकेशन काढण्यात आल्यानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT