Loksabha Election : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून जागावाटपाची प्राथमिक स्वरूपाची बोलणी सुरू आहे. भाजप-शिवसेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी युती केली होती. तेव्हा शिवसेनेने 23 जागा लढल्या होत्या आणि भाजपने 25 जागा लढल्या होत्या.
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मात्र भाजपने आपल्या दोन मित्र पक्षांना मिळून 22 जागा देणार असल्यामुळे भाजपकडे 26 जागा राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. हा दावा जर खरा असेल तर त्यामध्ये शिवसेना व अजित पवार यांच्या दोन्हीही गटाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे भाजपने जाहीर केलेला हा फॉर्म्युला महायुतीमधील मित्र पक्षांच्या पचनी पडणार का ? अशी चर्चा रंगली आहे.
याबाबत नुकतीच एका चॅनलला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मुलाखत दिली होती. त्यामध्ये लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानुसार 26 जागा भाजप लढेल असे सांगितले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून 22 जागा लढतील असा याचा अर्थ आहे. त्यामुळे येत्या काळात शिंदे शिवसेना गटाला 2019 मध्ये लढलेल्या जागा लढायला मिळणार नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. राष्ट्रवादीने काँग्रेसने चार जागा जिंकल्या होत्या. त्यांच्यासोबत एकच खासदार असल्याने त्यांना किती जागा मिळणार याकडे त्यांचे लक्ष असणार आहे.
महायुतीचे जागावाटप अजून ठरलेले नाही असे सांगितले जात असले तरी गेल्या वेळेप्रमाणे ज्या पक्षाने जागा लढून जिंकल्या होत्या, त्या त्यांच्याकडे राहणार आहेत. त्यामध्ये जर बदल करायचा असल्यास त्यात चर्चा करून बदल होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. सध्या शिंदे गटासोबत लोकसभेचे 13 खासदार आहेत. त्यांना तिकीट मिळणार की दोन-तीन जागा बदलून दिल्या जातील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी जर 11 जागा शिंदे गटाला दिल्या तर उर्वरित नऊ जागा अजित पवार गटाच्या वाटेला जातील, असा अंदाज आहे. अजित पवार यांच्या गटासोबत फक्त सुनील तटकरे रायगडचे एकमेव लोकसभा सदस्य आहेत. त्यामुळे सध्या तरी जागावाटपाबाबत संभ्रम अवस्था आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसरीकडे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रत्येकी 13 जागा देण्यात यावेत, अशी भूमिका राष्ट्रवादीकडून घेतली जाऊ शकते. त्यामुळे शिंदे गटाच्या दोन जागा कमी होऊ शकतात. त्यामुळे हा फॉर्म्युला शिंदे गट मान्य करेल, असे वाटत नाही. त्यामुळे लोकसभेसोबतच विधानसभेच्या जागांचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या दोन्ही मित्र पक्षांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.
भाजपने 2019 मध्ये 25 जागा लढवल्या होत्या आणि तब्बल 23 जागा जिंकल्या होत्या. यावेळेस मागील निवडणुकीच्या तुलनेत एक जागा अधिक लढण्याचा प्रयत्न आहे. महायुतीमध्ये दोन पक्षांना सोबत घेतले तरी आपण आपल्या जागा कमी होऊ दिले नाही, असा संदेश भाजप नेतृत्वाला या माध्यमातून दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक जागा वाढवून घेतली जाण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा जागावाटप अद्याप ठरले नसल्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eaknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीचे हे जागावाटप महायुतीमधील घटक पक्षाकडून कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या जागावाटपाबाबत संभ्रम अवस्था कायम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.