Congress bjp Sarkarnama
विश्लेषण

Bjp News : चंद्रपूरमधील दोन कार्यक्रमाने वाद चव्हाट्यावर; भाजपची वाटचाल काँग्रेसच्या दिशेने?

Chandrapur political controversy News : येत्या काळात स्थानिक गटबाजीवर नियंत्रण आणून पुन्हा एकीचा संदेश दिला नाही, तर चंद्रपूरप्रमाणे अशास्वरूपाच्या प्रकार इतर जिल्ह्यांमध्ये घडू शकतो. त्यामुळे वेळीच यावर आवर घालण्याची गरज आहे.

सरकारनामा ब्युरो

BJP News : भाजप पक्षाची खरी ओळख ही शिस्तबद्ध कार्यपद्धतीसाठीचा पक्ष अशीच आजपर्यंत राहिली आहे. विशेष म्हणजे संघटनात्मक बांधणी, आदेशाचे पालन, आणि नेतृत्वाप्रती निष्ठा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे तंतोतंत पालन केले जाते. मात्र, चंद्रपूरमध्ये नुकताच घडलेला प्रकार हा भाजपच्या या प्रतिमेला तडा जाणारा ठरला

राजकीयदृष्ट्या या चंद्रपूरमध्ये घडलेल्या घडामोडी भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. त्यामुळेच पक्षनेतृत्वाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. येत्या काळात स्थानिक गटबाजीवर नियंत्रण आणून पुन्हा एकीचा संदेश दिला नाही, तर चंद्रपूरप्रमाणे अशास्वरूपाच्या प्रकार इतर जिल्ह्यांमध्ये घडू शकतो. त्यामुळे वेळीच सावध होऊन यावर आवर घालण्याची गरज आहे.

भाजपच्या (BJP) स्थापना दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये आयोजित अधिकृत कार्यक्रमात माजी मंत्री व ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार गैरहजर राहिले. त्यांनी स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामुळे त्यांनी हे करीत असताना पक्षाची चौकट ओलांडली आहे. चंद्रपूरमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपमध्ये दोन गट पडल्याचे उघडपणे दिसले.भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त चंद्र्पुर शहरात दोन ठिकाणी कार्यक्रम पार पडला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. नक्की जायचं कुठे असा प्रश्न त्यांच्या समोर होता.

चंद्रपूरमध्ये झालेल्या या दोन्ही कार्यक्रमामध्ये भाजपचे स्थानिक आणि काही राज्यस्तरीय नेते सहभागी झाले होते. मात्र, या कार्यक्रमांचे स्वरूप, भाषणातील मुद्दे आणि सहभागी झालेल्या नेत्यांचे वक्तव्य पाहता यामधून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, काही मुद्दे हे काँग्रेसच्या विचारधारेच्या जवळ गेलेले वाटले, ज्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

गेल्या काही दिवसापासून चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांच्यातील वाद अद्याप मिटलेला नाही. त्यामुळेच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या दोन्ही ठिकाणच्या कार्यक्रमामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आमदार जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी हजेरी लावली. शिवाय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी ही उपस्थिती लावली होती. एकाच वेळी, एकच पक्षाचे, एकच शहरात, दोन कार्यक्रम झाल्याने कार्यकर्त्यांची मात्र, या निमित्ताने मोठी अडचण झाली होती. त्यांच्या पुढे कोणत्या कार्यक्रमाला जायचे हा प्रश्न सतावत होता.

चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील शीतयुद्ध जोरात रंगले होते. विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांना उमेदवारी मिळू नये यासाठी मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतरही जोरगेवार यांनी उमेदवारी मिळवली होती. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी मुनगंटीवार यांना मंत्रीपद मिळू नये,यासाठी फिल्डींग लावली होती अशी चर्चा होती.

त्यामुळेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने शोभाताई फडणवीस यांनी दोन्ही नेत्यांना ‘लोक भाजपची काँग्रेस झाली असे म्हणतील, तेव्हा वेळीच वाद संपुष्टात आणा,’ असे आवाहन त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव न घेता केले. या दोघांनाही काही खडे बोल सुनावले आहेत. तर दोघानांही कानपिचक्या घेतल्या आहेत. यावेळी त्यांनी कुणाचे थेट नाव घेण्याचे टाळले. पण त्यांचा इशारा कुणाकडे होता? हे मात्र उपस्थित सर्वांना समजले आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यामुळे भाजपचे कॉन्फिडन्स चांगलेच वाढले आहे. स्थानिक पातळीवर असलेले भाजपमधील संघर्ष जर वेळेवर सोडवले नाहीत, तर त्याचा परिणाम केवळ पक्षाच्या प्रतिमेवरच नाही, तर आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांतील परफॉर्मन्सवरही होऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच या गटबाजीला खतपाणी न घालता त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

गेल्या काही दिवसातील भाजपमध्ये स्थानिक पातळीवर असलेली अस्वस्थता आणि नेतृत्वातील असहमती आता या निमित्ताने उघड होऊ लागली आहे. हे वागणं पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या धोरणाशी विसंगत ठरणारे आहे. अशा प्रकाराची दखल घेऊन यावर वेळीच नियंत्रण आणले नाही, तर येत्या काळात स्थानिक निवडणुकांमध्ये याचा फटका भाजपला बसू शकतो.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT