Mumbai Political News : दिवाळीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई महापलिकासोडून इतर ठिकाणी महायुती होण्याची शक्यता कमी असली तरी काही ठिकाणी विरोधी पक्षाला संधी न देता महायुतीमधील मित्रपक्षातच निवडणूक होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीचा फायनल प्लॅन ठरला आहे.
राज्यभरातील सत्ता टिकवण्यासाठी महायुतीमधील या तीन पक्षांची गुप्त रणनीती उघड झाली आहे. दुसरीकडे, येत्या काळात ठाकरे बंधू आणि मविआ आता या महायुतीच्या चक्रव्यूहाला कसे भेदतात, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
महायुतीकडून जिल्हा पातळीवर तीन मंत्र्यांची समिती
महायुतीमधील भाजप (BJP), एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्याची बैठक पार पडली. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीचा फायनल प्लॅन ठरला आहे.
त्यानुसार या बैठकीत महायुतीकडून जिल्हा पातळीवर तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये तीन पक्षाच्या मंत्र्यांचा सहभाग असणार आहे. या तीन मंत्र्यांची समिती जिल्ह्यातील महायुतीच्या जागावाटपाबत चर्चा करणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महायुतीबाबतचे सर्व निर्णय घेतले जाणार आहेत.
जिल्हा समितीत पालकमंत्री आणि दोन्ही पक्षांचे आमदार व नेतेही
महायुतीच्या या जिल्हा पातळीवरील समितीत तीन पक्षाच्या मंत्र्यासह दोन्ही पक्षांचे आमदार व नेत्यांचा समावेश असणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच जिल्ह्यातील सर्व निर्णय घेतले जाणार आहेत. त्यासाठी एक-दोन दिवसातच जिल्हा पातळीवरील समित्यांची घोषणा करण्यात येणार आहे. या समितीत तीन पक्षाचे नेते सहभागी असणार असल्याने निवडणुकीची रणनीती ठरविणे सोपे जाणार आहे.
जिल्हा पातळीवरील समिती 8 दिवसांत सविस्तर अहवाल देणार
निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी नेमण्यात आलेली जिल्हा पातळीवरील समिती 8 दिवसांत सविस्तर अहवाल देणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील राजकीय स्थिती, महायुतीच्या पक्षांची ताकदीवर अहवालात प्रकाश टाकण्यात येणार आहे. महायुती अंतर्गत असलेल्या वादाचीही अहवालात सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णय घेणे शक्य होणार आहे.
जिल्हा समन्वय समितीचा अहवाल राज्य समिती समोर मांडणार
जिल्हा पातळीवरील समितीकडून अहवाल सादर करण्यात आल्यानंतर त्यांच्या वादाच्या जागा, वादाची कारणे यावर महायुतीचे मुख्य नेते निर्णय घेणार आहेत. त्यामुळे महायुतीमधील तीन पक्षात येत्या काळात जाहीर तणाव निर्माण होणार नाही याची काळजी राज्य समन्वय समिती पाहणार आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय असणार या अहवालात
या अहवालात जिल्ह्यातील परिस्थिती, महायुती आणि महायुतीअंतर्गत असलेल्या पक्षाची ताकद आणि परिस्थिती याचा ही आढावा असणार आहे. तसेच ज्या जिल्ह्यात महायुती अंतर्गत वादाची सविस्तर माहिती मांडणार आहे.
हा संपूर्ण अहवाल, आढावा जिल्हा समन्वय समिती राज्य समिती समोर पुढील आठ दिवसात मांडणार आहे. राज्य सरकारकडे अहवाल आल्यानंतर ज्या ठिकाणी वाद असतील त्या ठिकाणचे निर्णय महायुतीचे मुख्य नेते घेतील. कोणत्याही ठिकाणी जाहीरपणे तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी राज्य समन्वय समितीकडून घेतली जाईल.
निवडणुकीच्या घोषणेकडे लक्ष
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात लवकरच होणार आहेत. दिवाळीनंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार आहेत. तर नगरपरिषदेच्या डिसेंबरदरम्यान होणार आहेत तर दुसरीकडे महापलिकांची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून मायक्रो प्लनिंग करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात उद्धव व राज ठाकरे (Raj Thackeray) बंधू आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता या महायुतीच्या चक्रव्यूह कसे भेदतात, याची उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.