Shivsena Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दमदार वक्तृत्व आणि कार्यशैली यामुळे असंख्य तरुणांना शिवसैनिक बनवले. त्यामुळे आंदोलनात भर पडली. यामुळे अनेक शाखाप्रमुख शहराच्या ठिकाणी नगरसेवक झाली तर ग्रामीण भागातील शाखाप्रमुख आमदार झाले. शिवसेनेमुळेच अनेक शाखाप्रमुख नगरसेवक, आमदार, खासदार व मंत्री पदापर्यंत पोहचले.
शिवसेनेच्या विचारसरणीने प्रेरित असणाराच शाखा सुरू करेल, असा बाळासाहेब ठाकरे यांना गाढा विश्वास होता. शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत दिवसभर त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नागरिक मोठया संख्यने येत असतात. शाखेमध्येच तक्रारी सोडवल्या जातात, यामुळेच प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यासाठी शिवसेनेच्या शाखेपर्यंत धाव घेत असल्याचे चित्र आजही काही शाखांमध्ये दिसते.
1980 ते 90 च्या दशकात शिवसेनेकडे निरोप पोचविण्यासाठी एक जलद संदेश यंत्रणा होती. त्याकाळी लँडलाईनची सुविधा होती. त्यावेळी शिवसेनेच्या प्रत्येक शाखांमध्ये किंवा शाखांच्या जवळ दुकानांमध्ये लँडलाइन होती. त्यामुळे बाळासाहेबांचा कोणताही संदेश शिवसैनिकांपर्यंत पटकन पोहोचवला जात होता. त्यामुळे प्रत्येक आंदोलनाची दिशा लगेचच समजत होती.
महाराष्ट्रातील प्रत्येक शाखेत, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न प्रथम हाताळले जातात. ज्याला कोणालाही शाखा स्थापन करायची आहे तो तसे करू शकतो आणि स्वतःला शाखाप्रमुख म्हणून घोषणा देखील करता येते. शिवसेनेच्या विचारसरणीने प्रेरित असणाराच शाखा सुरू करेल, असा बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) त्याकाळी गाढ विश्वास होता. त्यामुळे तसे करण्याचे स्वातंत्र्य होते. शहरप्रमुख या प्रक्रियेची तपासणी करतात.
1966 मध्ये शिवसेनेची एक संघटना म्हणून सुरुवात झाली तेंव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यवसायाने व्यंगचित्रकार होते. त्यांनी मराठीतील मार्मिक हे मासिक सुरू केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मासिकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे सरकार होते आणि ठाकरे यांचे पक्षाच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. मार्मिकच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसांना किंवा मातीच्या सुपुत्रांना प्राधान्य देणारे व प्रभावित करणारे विविध प्रश्न हाताळण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याला बळ मिळत गेले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने शिवसेना एक संघटना म्हणून आकार घेत होती. त्यावेळी सत्ताधाऱ्याविरोधात आक्रमकपणे आंदोलने केली जात होती. त्यामध्ये तोड-फोड आंदोलने शिवसेनेचा मुख्य भाग झाला होता. रस्त्यावर उतरून आंदोलने करत निर्णय बदलायला लावण्याची ताकद शिवसेनेच्या आंदोलनात होती. त्यामुळेच ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्याने तरुण वर्ग संघटनेकडे खेचला जात होता. जरी ते अनेक वर्षे मुंबईत केंद्रित असले तरी, ठाकरे यांनी शेजारच्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या भागातील वाढीस प्रोत्साहन दिले.
बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेचे राजकीय पक्ष बनविण्यास भाग पाडले. 19 जून 1966 रोजी ती एक सेवा संस्थेतून राजकीय संघटनेत गेली. मुंबईनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. दिवसेंदिवस त्याकाळी शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता. त्यामुळे शिवसेना वाढीसाठी मोठे बळ मिळत गेले.
शिवसेना म्हणजे खऱ्या अर्थाने एक केडर आधारित पक्ष आहे. शिवसेनेची एक श्रेणीबद्ध पद्धत आहे. शाखाप्रमुख हा शिडीच्या सर्वात खालच्या पायरीवर असतो. यामध्ये पदानुसार उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उप शहर प्रमुख, शहर प्रमुख, संपर्क मंत्री, उप नेता आणि नेता अशी पदाची रचना करण्यात आलेली आहे. त्यानुसार पक्षाचे वरिष्ठ नेते थेट शिवसेनाप्रमुखांना कुठल्याही घटना घडामोडी कळवतात, अशी थेट रचना केलेली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी संघटनेत अगदी सुरुवातीपासून तळागाळात थेट काम केले होते. त्यामुळे त्यांनी शाखांना जास्त महत्त्व दिले. शिवसेनेच्या जडण -घडणीत त्यांनी शाखांच्या प्रभावी प्रशासनासाठी, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे शहर (शहरी) आणि जिल्हा (ग्रामीण) असे दोन भाग केले होते. त्याचा शिवसेना वाढीसाठी मोठा फायदा झाला. शहरी व ग्रामीण भागात शिवसैनिकांचे मोठे जाळे विणले गेले. त्याचा खूप मोठा संघटनात्मक फायदा शिवसेनेला झाला.
शिवसेनेच्या आंदोलनात्मक राजकारणामुळे तळागाळातील मंडळींना वेळोवेळी बळ मिळाले. वेळोवेळी रस्त्यावर उतरणाऱ्या मंडळींमुळे शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलने केली. त्यामुळे तळागाळात शिवसेनेत ताकदवान नेते उदयास आले. मग आंदोलनासाठी परवानगी घ्यावी लागली नाही. जोपर्यंत तोडफोड होत नाही तोपर्यंत तुमचे कोणी ऐकत नाही, असा प्रत्येक शिवसैनिकांचा विश्वास होता.
बाळासाहेबांचे दमदार वक्तृत्व आणि कार्यशैली यामुळे असंख्य तरुणांना शिवसैनिक बनवले. त्यामुळे आंदोलनात भर पडली. यामुळे अनेक शाखाप्रमुख शहराच्या ठिकाणी नगरसेवक झाली तर ग्रामीण भागातील शाखाप्रमुख आमदार झाले. शिवसेनेमुळेच अनेक शाखाप्रमुख नगरसेवक, आमदार, खासदार व मंत्री पदापर्यंत पोहचले. हे केवळ शिवसेनेतच होऊ शकते हे 1995 साली राज्यात आलेल्या भाजप-शिवसेना (Bjp) युतीचे सरकार आले. त्यावेळी अगदी सर्वसामान्य शिवसैनिकाला आमदार होता आले तर काहीजण मंत्री झाले.
गेल्या दोन वर्षांत शिवसेनेत मोठी फूट पडली. सध्या शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून खाली खेचत एकनाथ शिंदे (Eknath shinde) 40 आमदारांसह बाहेर पडले. त्यानंतर 30 जून 2022 ला भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे शिवसेनेत पडलेली ही उभी फूट ही कार्यकर्त्यांसाठी वेदनादायी ठरली आहे.