Video Chhagan Bhujbal : भुजबळ अजितदादांचं 'घड्याळ' सोडून ठाकरेंची 'मशाल' हाती घेणार?

Chhagan Bhujbal News : लोकसभेचं तिकीट नाही मिळाल्यानंतर राज्यसभेवरही भुजबळांना संधी मिळाली नाही. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याचं बोललं जात होते.
Chhagan Bhujbal | Uddhav Thackeray
Chhagan Bhujbal | Uddhav Thackeray sarkarnama

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. भुजबळ नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. पण, महायुतीत नाशिकची जागा शिंदे सेनेकडे गेल्यानं भुजबळांना संधी मिळाली नाही.

नंतर भुजबळ राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षानं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना सधी दिली. यामुळे भुजबळ नाराज असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं 'घड्याळ' सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यासह भुजबळ ठाकरेंच्या शिवसेनेसोबत संपर्कात असल्याचं माहिती मिळत आहे.

पण, भुजबळांचं आता शिवसेनेशी कोणतंही नाते नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे गेली आहे, असंही राऊतांनी सांगितलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, "भुजबळांचं आता शिवसेनेशी कोणतंही नातं नाही. एकेकाळी ते शिवसेनेत असताना मोठे नेते होते. पण, नंतर त्यांनी पक्ष बदलले. ते पुन्हा शिवसेनेत येत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांचा प्रवास फार मोठा आहे. मात्र, राजकीय प्रवासात शिवसेना आता फार पुढे गेली आहे."

"त्यांना शिवसेनेचा कुणीही नेता भेटलेला नाही आणि भेटणारही नाही. त्यामुळे चर्चेचा प्रश्नच येत नाही. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे गेली आहे," असं राऊतांनी म्हटलं.

भुजबळांनी काय सांगितलं?

भुजबळांनी कुणाच्याही संपर्कात नसून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चा खोट्या आहेत. मी अजितदादांसोबत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचं भुजबळांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com