Pune Porshe Accident : विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र..

Ambadas Danve यासाठी जबाबदार असलेल्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावरही नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी, असे दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
Ambadas Danve, Eknath Shinde
Ambadas Danve, Eknath Shindesarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : पुणे अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच विनापरवानगी पोर्शे वाहन वितरीत करण्याऱ्या वितरकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पुणे शहरातील कल्याणीनगर भागातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने 19 मे रोजी पहाटे उशिरापर्यंत पार्टी करून मद्यधुंद अवस्थेत एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अनिस अवधिया व अश्विनी कोस्ता या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. हि बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

यामध्ये अग्रवाल यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला वाहन परवाना नसताना वाहन चालविण्यास दिल्याने दोन निरापराध व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या अग्रवाल यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच पोर्शे वाहन हे परराज्यातून आणले असून त्याची नोंदणी झालेली नाही. तसेच वाहन क्रमांक देखील देण्यात आलेला नाही. वाहनाचा वाहनकर सुध्दा भरलेले नाही.

Ambadas Danve, Eknath Shinde
Pune Porsche Accident Case : कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसच आरोपींच्या पिंजऱ्यात; न्यायालयीन चौकशी करण्याची विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची मागणी !

तरी देखील 2-3 महिन्यांपासून सदरचे वाहन वापरात होते. या वाहनावर संबंधित परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई केली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावरही नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी, असे दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

ज्या पबमध्ये अल्पवयीन मुलाने पार्टी करून मद्यपान केले अशा कोझी पबमध्ये व ब्लॅक पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलांना मद्य दिले जाते. त्यामुळे या पब वर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच, पुणे शहरात मोठया प्रमाणात महाविद्यालयीन मुले पबमध्ये जात असून ते अल्पवयीन आहेत की नाही याची तपासणी केली जात नाही. त्यामुळे अशा सर्व पबची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या पुणे शहरातील सर्व पब व बारवर कारवाई करुन पबचे परवाने रद्द करण्यात यावेत.

Ambadas Danve, Eknath Shinde
Pune Porsche Accident : RTO चा गरिबांना दंड, श्रीमंतांकडे कानाडोळा; दोघांना चिरडणारी 'पोर्श' विनानोंदणीच धावली...

पोर्शे कंपनीच्या वितरकाने विना नोंदणी व विना क्रमांक वाहन ग्राहकाला वापरण्यासाठी दिले आहे. सदरची बाब गंभीर असून याची चौकशी करण्यात यावी. अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिस ठाण्यात व्ही. आय. पी. वागणूक देवून घाईघाईने त्याला जामीन मिळण्यास मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे यासंबंधी दोषी अधिकाऱ्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देखील कारवाई तातडीने करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली. मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने पावले उचलावीत, असेही दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.

Edited By : Umesh Bambare

Ambadas Danve, Eknath Shinde
Ambadas Danve On Modi : भाजपकडून मोदींच्या सभेचा गवगवा, तर ठाकरेंच्या नेत्याने केले हे प्रश्न...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com