Ambadas Danve On Modi : भाजपकडून मोदींच्या सभेचा गवगवा, तर ठाकरेंच्या नेत्याने केले हे प्रश्न...

Lok Sabha Election 2024 : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोदींकडून सभांमधून गवगवा केल्या जात असलेल्या केंद्रातील अनेक योजनांचे पोस्टमार्टम केले.
Ambadas Danve -Narendra Modi-Chandrashekhar Bawankule
Ambadas Danve -Narendra Modi-Chandrashekhar BawankuleSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar,18 May : महाराष्ट्रातील लोकसभा निडणुकीचा पाचवा आणि अंतिम टप्पातील प्रचार आज संपला. मुंबईसह नाशिक, धुळे व इतर मतदारसंघासाठी महाविकास आघाडी-महायुतीच्या नेत्यांनी चांगलाच जोर लावला. विशेषतः मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांवर महायुतीने अधिक भर दिल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्यातील सर्वच महायुतीच्या नेत्यांनी मुंबईत ठाण मांडले होते.

मुंबईतील सभा आणि ‘रोड शो’ मधून मोदींनी (Narendra Modi) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मोदींकडून सभांमधून गवगवा केल्या जात असलेल्या केंद्रातील अनेक योजनांचे पोस्टमार्टम केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ambadas Danve -Narendra Modi-Chandrashekhar Bawankule
Tanaji Sawant : फडणवीसांना जाहीर सभेत दिलेला शब्द तानाजी सावंत कसा पूर्ण करणार?

याच अनुषंगाने अंबादास दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आपण या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता का? असा चिमटा काढत दानवे यांनी शस्त्रास्त्रांची आयात लक्षणीयरीत्या कमी करण्यात सरकारला यश आले का?, मेक इन इंडियाचे काय झाले?, 'मुद्रा' योजनेत किती कर्जाची परतफेड केली आहे?,

नीरव मोदीचे काय झाले? तसेच काही वर्षांपूर्वी आपण मुंबईच्या सिंधू सागर/अरबी समुद्रात भूमिपूजन केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम कुठेपर्यंत गेले आहे?, अशा प्रश्नांची सरबत्ती केली आहे. यावर भाजपकडून काय उत्तर मिळते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त महाराष्ट्रात आलेल्या मोदी-शहांनी आपल्या सगळ्याच सभांमधून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला लक्ष केल्याचे दिसून आले.

Ambadas Danve -Narendra Modi-Chandrashekhar Bawankule
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस आमदाराच्या हवाल्याने ठाकरेंच्या उमेदवाराचा अडीच लाख मतांनी जिंकण्याचा दावा...

नकली शिवसेना आणि नकली संतान म्हणत मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. ही टीका जिव्हारी लागल्याने स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. मुंबईत मोदी विरुद्ध ठाकरे या शाब्दिक युद्धाला चांगली धार आली. मुंबईतील सहापैकी सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून भाजप उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच घरात मात देण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

Ambadas Danve -Narendra Modi-Chandrashekhar Bawankule
Marathwada Lok Sabha Campaign : मराठवाड्याच्या प्रचारसभांमध्ये घुमला मोदी, शाह, ठाकरे, ओवेसींचा आवाज...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com