Ashok Kharat Case: महिलांना आकर्षित करण्यासाठी विविध 'ट्रिक्स'; विकृत खरातची कबुली; 'एका वाक्यात दिलं उत्तर

SIT investigation Ashok Kharat case: 'दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए' अशी धक्कादायक कबुली खरातने पोलिस कोठडीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
bhondubaba case; Ashok Kharat
bhondubaba case; Ashok Kharatsarkarnama
Published on
Updated on

Kharat case latest news: भोंदू अशोक खरात यांच्या एसआयटी चौकशीत अनेक खुलासे होत आहेत. आज एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते पत्रकार परिषदेत खरात यांच्या कारनाम्यांविषयी सविस्तर माहिती देण्याची शक्यता आहे. सध्या सुरु असलेल्या तपासात खरातने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांसमोर त्याने अत्यंत धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत.

महिलांना कशाप्रकारे तो आकर्षित करीत होतो, याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली, महिलांना धमकावल्याची आणि हातचलाखीने आकर्षित करून त्यांचे शोषण केल्याचे त्याने सांगितले. 'दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए' अशी धक्कादायक कबुली खरातने पोलिस कोठडीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

bhondubaba case; Ashok Kharat
Sunil Shelke News: सुनील शेळकेंच्या आदेशानंतर राजकीय भूकंप; 9 संचालकांच्या निर्णयाने बाजार समिती बरखास्त होणार?

अनेक बुवा-बाबा जे चत्मकार दाखवतात, किंवा वशीकरण करतात, ती केवळ त्यांची हातचलाखी असते, आपलीही हातचलाखी होती, असे त्याने कबुल केले, हे सांगताना केलेल्या कृत्याचे समर्थन केले आहे. कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप त्याने व्यक्त केला नाही.

bhondubaba case; Ashok Kharat
Sunetra Pawar: सुनेत्रावहिनींनी अर्ज भरण्यापूर्वी एका बॅनरनं वेधलं लक्ष! तटकरे, पटेलांचा एकेरी उल्लेख, 'अजितदादांचे फक्त नावच...'

महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो विविध 'ट्रिक्स' वापरत असे, त्याने त्याने विज्ञानाचे नाव दिले आहे. मानसिक दबावाखाली आणून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केले, कबुली जबाबात त्याने अनेक वेळा विज्ञान युगाचा दाखला दिला. जे काही केले, ते लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानातील काही क्लुप्त्या वापरून केल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती आहे.

bhondubaba case; Ashok Kharat
TET exam : लाखो शिक्षकांना TET परीक्षेतून दिलासा मिळणार? टांगती तलवार हटवण्यासाठी प्रश्न थेट संसदेत

महिलांना कशाप्रकारे गंडवलं? महिलांना कसं आकर्षित केलं? महिलांना या गोष्टी करण्यासाठी कसा राजी करायचा? त्यांना गंडा घालण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या? यासारख्या प्रश्नांवर खरातने आपला सहा शब्दांचा खास मंत्रच विशेष तपास समितीला सांगितला आहे. खरातनेच तो महिलांना कसं आपल्या जाळ्यात ओढायचा याबद्दलची माहिती सांगितली आहे.

bhondubaba case; Ashok Kharat
Sharad Pawar News: शरद पवारांनी घेतली तिसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदारकीची शपथ; पवारांच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेत

आज सातपुते काय बोलणार?

लोक मूर्ख बनतात त्यांना केवळ मूर्ख बनवणारा हवा, यात तत्वावर आपण काम करायचो असं खरातने पोलिसांना सांगितलं आहे. खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे. आज सांयकाली एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपूते या तपासाबाबत माध्यमांना माहिती देणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com