Abhijeet Deepke: अभिजीत दीपके यांना अटक; कोर्टात हजर करणार, तिहार तुरुंगात जाणार का?

Delhi Police Arrested Abhijeet Deepke: दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना तिरंगा मार्चपूर्वी अटक केली. आजच्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार, याकडे लक्ष लागले आहे.
Delhi Police Arrested Abhijeet Deepk
Delhi Police Arrested Abhijeet Deepk
Published on: 
Updated on: 

Abhijeet Deepke News: दिल्लीतील तिरंगा मार्चपूर्वी ताब्यात घेतलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आज विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. त्यामुळे अभिजीत दीपके यांना न्यायालयीन कोठडी सुनावली जाणार का आणि त्यांची रवानगी तिहार तुरुंगात होणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांच्याविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा आणि दंडविषयक कायद्याच्या संदर्भातील बीएनएस कलम १२६ आणि १७० अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांना पोलिसांनी सोडून दिले आहे. दिल्ली पोलीस कायद्याच्या कलम ६५ अंतर्गत आवश्यक औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

तिरंगा मार्चपूर्वी पोलिसांची कारवाई

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि सीजेपीचे नेते आशुतोष रांका व सौरव दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ शुक्रवारी दिल्लीत तिरंगा मार्च काढण्यात आला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अभिजीत दीपके आणि नेहा बोरा या दोघांनाही ताब्यात घेतले होते.

Delhi Police Arrested Abhijeet Deepk
Maval BJP: मावळमध्ये भाजपला दणका! सरकारी जागेवरील अतिक्रमण भोवलं; नगरसेवकपद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

दिल्लीतील सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी पोलिसांनी केवळ ११ जणांना परवानगी दिली होती. मार्चसाठी निघण्यापूर्वीच अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर नेहा बोरा यांच्यावरही कारवाई करण्यात आली. पुढे दीपके यांना अटक करण्यात आली, तर बोरा यांची सुटका झाली.

Delhi Police Arrested Abhijeet Deepk
Pankaja Munde: पालकमंत्री असूनही मराठा आंदोलनात ज्या गावात पाय ठेवला नाही, तेच अंतरवाली सराटी पंकजा मुंडेंनी घेतलं दत्तक!

रांका आणि दास यांच्याप्रमाणे कारवाई होणार?

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे आता अभिजीत दीपके यांच्याबाबत न्यायालय काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे. मात्र, त्यांना तिहार तुरुंगात पाठवले जाणार की अन्य निर्णय होणार, हे सुनावणीनंतरच स्पष्ट होईल.

अभिजीत दीपके यांच्या सुनावणीत दंडाधिकारी काय निर्णय देतात आणि त्यांना कोठडी मिळते का, याकडे सीजेपीच्या कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com