Abhijeet Dipke: सोनम वांगचुक यांच्यासाठी अभिजीत दिपकेनं पोलिसांसमोर जोडले हात! म्हटलं, मृत्यूनंतरच...

Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पोलिसांना साध्या सुविधांबाबत प्रश्न विचारला आहे. पोलिसांकडून या आंदोलनात बऱ्याच गोष्टी करण्यास मज्जाव केला आहे.
Sonam Wangchuk at Cockroach party  andolan
Sonam Wangchuk at Cockroach party andolan
Published on
Updated on

Abhijeet Dipke: देशभरात झालेल्या परीक्षांमधील अनागोंदी कारभाराविरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. पण या आंदोलनस्थळी साध्या साध्या सुविधांना देखील पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला आहे. या सुविधा इथं मिळाव्यात यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पोलिसांना हात जोडत या सुविधांबाबत प्रश्न विचारला आहे. सध्या या आंदोलनस्थळी वैज्ञानिक आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १६वा दिवस आहे. पण केंद्र सरकारकडून त्यांच्या मागण्यांची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही.

अभिजीत दिपकेंचा पोलिसांना हात जोडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत वांगचुक यांचा उल्लेख करत दिपके पोलिसांना म्हणत आहेत की, "सर मी तुमच्यासमोर हात जोडतो, त्या माणसाला उन्हाचा त्रास होत आहे. या माणसाला सध्या खूपच त्रास होतो आहे. तुम्ही त्यांच्यापुढे इतक्या अडचणी का निर्माण करत आहात. तुम्ही त्यांचं जीवन क्लेशकारक का केलं आहे" यावर संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं उत्तर दिलं की, ताडपत्री हटवून दाखवा की उन कुठे आहे? त्यावर दिपके पुन्हा म्हणतात की, सर तुमच्यासमोर हात जोडतो आहे, त्यांच्या मरणानंतरच तुम्हाला समाधान मिळणार आहे का? त्यांना उन लागतंय म्हणून तर आम्ही ही ताडपत्री लावली आहे. जेव्हा उन नव्हतं तेव्हा आम्ही हे लावलं नव्हतं.

Sonam Wangchuk at Cockroach party  andolan
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवडीला आव्हान! राष्ट्रवादीतूनच 'या' नेत्यानं घेतला कायदेशीर आक्षेप

या नेत्यांनी आंदोलनावर व्यक्त केली चिंता

केरळचे माजी आरोग्य मंत्री के. के. शैलजा, माजी अर्थमंत्री आणि सध्याचे आमदार के. एन. बालगोपाल यांनी आंदोलनस्थळाचा दौरा केला आणि परीक्षांमध्ये होणाऱ्या गडबड घोटाळ्यांवर चिंता व्यक्त केली. त्यांना यावर भर दिला की, देशाच्या तरुणांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक पारदर्शी आणि विश्वसनीय परीक्षा यंत्रणा तयार करणं गरजेचं आहे. तसंच समाजवादी पार्टीचे खासदार पुष्पेंद्र सरोज यांनी देखील आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांचं समर्थन केलं. तर आम आदमी पार्टीचे आमदार संजीव झा यांनी आंदोलनाप्रती एकजुटता दाखवली.

Sonam Wangchuk at Cockroach party  andolan
Anuradha Paudwal: 'विश्वगुरु... विश्वगुरु' म्हणणं बंद करा! प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी मोदी सरकारला जोरदार सुनावलं

तसंच महाराष्ट्रातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या आंदोलनाला आपल्या पक्षाचा पाठींबा जाहीर केला. त्यांनी म्हटलं की, २० जुलै रोजी दिल्लीत क्रॉकोच पार्टीच्यावतीनं संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात लोकांनी जिथं आहे तिथून पाठिंबा देत यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही केलं. आपणही या मोर्चाला हजेरी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच राहुल गांधींनी देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. एकप्रकारे ठाकरेंनी या आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ दिलं आहे.

दरम्यान, राजकीय नेत्यांच्या या वाढत्या पाठिंब्यावर अभिजीत दिपकेंनी म्हटलंय की, "या आंदोलनाला वाढत चाललेला जनतेचा पाठिंबा या गोष्टींचं प्रतिक आहे की, परीक्षा पद्धतींमध्ये सुधारणा होणं हा राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. हे निषेध आंदोलन तोपर्यंत सुरुच राहील जोपर्यंत पेपर लीक आणि परीक्षांच्या अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित होत नाही. पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत"

Sonam Wangchuk at Cockroach party  andolan
FDA Milk Purchase Rule: तुकाराम मुंढेंच्या खात्याच्या नव्या नियमांमुळे दुग्ध व्यवसायाला फटका; राष्ट्रवादीचा बडा नेता नाराज

उपोषणाचा १६ वा दिवस

सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आजचा १६ वा दिवस आहे. या उपोषण काळात ते केवळ पाणी पित आहेत. त्यामुळं त्यांची प्रकृती खालावत चालली असून आजच्या दिवसापर्यंत त्यांचं ८ किलो वजन घटलं आहे. डॉक्टर सातत्यानं त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. पण अद्याप सरकारचं त्यांच्याकडं लक्ष गेलेलं नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com