Narendra Modi Video : PM मोदींच्या इन्स्टाग्राम व्हिडिओवर अभिजीत दिपकेंची कमेंट, 'तुमची त्वचा...'

Abhijit Dipke Narendra Modi Instagram Video : संसदेत सार्वजनिक परीक्षा संशोधन विधेयक मंजुर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ करत संवाद साधला. या व्हिडिओच्या खाली अभिजीत दीपके यांनी कमेंटकर टीका केली आहे.
Abhijit Dipke's comment on Prime Minister Narendra Modi's Instagram video has drawn attention and sparked political reactions on social media.
Abhijit Dipke's comment on Prime Minister Narendra Modi's Instagram video has drawn attention and sparked political reactions on social media.sarkarnama
Published on
Updated on

Abhijit Dipke News: लोकसभेनंतर राज्यसभेत देखील 'सार्वजनिक परीक्षा संशोधन विधेयक' मंजुर झाले. त्यानंतर गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी करत पेपर लीक माफिया आणि घोटाळेबाजांना इशारा दिला. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या एकाही दोषीला सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर होणार असे ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या या इन्स्टाग्रामवर व्हिडिओवर अनेक कमेंट्स आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या निर्णयाचे स्वागत अनेकांनी केले आहे. मात्र, या व्हिडिओवरील काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या कमेंट्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

दीपके यांनी मोदींच्या व्हिडिओवर 'देशाच्या भविष्यापेक्षा तुमची त्वचा अधिक चमकतेय', असा सणसणीत टोला लगावला आहे.

मोदी काय म्हणाले?

मोदींनी व्हिडिओ म्हटले आहे की, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पेपर लीक माफींच्या विरोधात मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. टास्क फोर्स, फास्ट ट्रक कोर्टाची रचना या विधेयकामध्ये आहे. राज्यांनी केलेल्या सूचनांकडे देखील लक्ष दिले आहे.

पेपर फोडणाऱ्या माफियांना सोडले जाणार नाही. आम्ही संसदेत बील आणले. संसदेच्या दोन्ही सभागृहात सदस्यांनी यावर सविस्तर चर्चा केली. दोन्ही सभागृहात हे बील पास झाले.

Abhijit Dipke's comment on Prime Minister Narendra Modi's Instagram video has drawn attention and sparked political reactions on social media.
The Accidental Cockroach Party Movie: आता रुपेरी पडद्यावर उलगडणार 'कॉकरोच'ची कहाणी! अभिजीत दिपकेंच्या भूमिकेत कोण?

राहुल गांधींची टीका

जंतर मंतरवर आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा देखील केले जात आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा - तुम्ही झेन-झी ला धमकावून गप्प करू शकत नाही. आधी तुम्ही त्यांची हाडे मोडलीत. आता तुम्ही त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करत आहात आणि त्यांची खाती बंद करत आहात.तुम्ही भारताचा भूतकाळ आहात. भारताच्या भविष्याशी वागताना सावध राहा.

Abhijit Dipke's comment on Prime Minister Narendra Modi's Instagram video has drawn attention and sparked political reactions on social media.
Rahul Gandhi Vs Amit Shah : अमित शाहंसोबत घेतलेला पंगा राहुल गांधींना भोवणार? खासदारकीवरच घाव घालण्याची तयारी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com