एकाच फोटोतून जगाला दिसणारा तालिबानचा सर्वेसर्वा समोर आला पण...

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून तालिबानचा सर्वेसर्वा असलेला शेख हैबतुल्ला अखुंजादा हा समोर आला नव्हता.
Haibatullah Akhundzada
Haibatullah Akhundzada Sarkarnama
Published on
Updated on

काबूल : अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता हाती घेतल्यापासून तालिबानचा सर्वेसर्वा असलेला शेख हैबतुल्ला अखुंजादा (Haibatullah Akhundzada) हा समोर आला नव्हता. त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू होती. अखेर तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर अडीच महिन्यांनी तो सार्वजनिकरीत्या समोर आला आहे. परंतु, आता त्याचा एकही फोटो अथवा व्हिडीओ समोर आलेला नाही. आतापर्यंत केवळ एकाच फोटोतून हैबतुल्ला हा जगाला माहिती आहे.

अमेरिकेच्या हल्यात 2016 मध्ये तालिबानचा संस्थापक मुल्ला मन्सूर अख्तर मारला गेल्यानंतर तालिबानची सूत्र शेख हैबतुल्लाच्या हातात आली. त्याचवेळी त्याचं एक छायाचित्र प्रसिध्द करण्यात आलं होतं. त्यानंतर तो कधीच जगासमोर आला नव्हता. तो खूपच धार्मिक आहे. अख्तर मारला गेल्यानंतर विभागलेल्या तालिबानला संघटित करण्याची महत्वाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या नेतृत्वाखाली तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंदाहारमधील एका मशिदीत त्याने नुकतीच जाहीररीत्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. दारूल उलूम हकिम मदरसा या प्रसिद्ध असलेल्या मदरशात त्याने सैन्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यामुळे हैबतुल्लाचा मृत्यू झाल्याच्या सर्व अफवा असल्याचे समोर आले आहे. तालिबानचा सर्वेसर्वा असलेला मुल्ला हैबतुल्ला याचा आधीच मृत्यू झाल्याची चर्चा होती. कारण तालिबानने सत्ता मिळवून एवढे दिवस झाल्यानंतरही तो समोर आलेला नव्हता. परंतु, तो सार्वजनिक जीवनात प्रकटल्यानंतर एकही फोटो अथवा व्हिडीओ समोर आलेला नाही. यामुळे काहीशी साशंकता व्यक्त केली जात आहे.

Haibatullah Akhundzada
मृत्यू झाल्याची चर्चा असलेला तालिबानचा सर्वेसर्वा थेट कंदाहारमधील मशिदीत प्रकटला

एकच प्रमुख नेता नसतानाही तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याची चर्चा सुरू होती. मुल्ला हैबतुल्ला हा 1990 मध्ये तालिबानमध्ये दाखल झाला. तो मूळचा कंदाहारचा असल्याचं सांगितलं जातं. सध्याही तो तिथंच असल्याचा दावा तालिबानकडून केला जात आहे. 1995 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर त्याच्यावर देशाचा गुन्ह्यांचा आलेख कमी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. 2015 मध्ये तालिबानच्या उपप्रमुख बनला होता. नंतर तो तालिबानचा प्रमुख बनला होता.

Haibatullah Akhundzada
वानखेडेंना क्लिनचिट देणारा राष्ट्रीय आयोगाचा उपाध्यक्ष भाजपचाच नेता!

दरम्यान, तालिबानच्या प्रवक्त्यांनी अखुंजादा हा अफगाणिस्तानमध्येच असल्याचा दावा आधी केला होता. तो सुरवातीपासूनच कंदाहारमध्ये होता. तालिबानची सत्ता आल्यानंतर राजधानी काबूलमध्ये घडामोडींवर तो कंदाहारमधून लक्ष ठेवत होता. परंतु, तो सार्वजनिकरीत्या हजेरी लावत नसल्याने तालिबान समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. यामुळेच त्याच्या मृत्यूच्या अफवांना खतपाणी मिळाले होते. आता त्याने सार्वजनिक जीवनात हजेरी लावल्याने तालिबानमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com