मृत्यू झाल्याची चर्चा असलेला तालिबानचा सर्वेसर्वा थेट कंदाहारमधील मशिदीत प्रकटला

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून तालिबानचा सर्वेसर्वा असलेला मुल्ला हैबतुल्ला अखुंजादा हा समोर आला नव्हता.
Haibatullah Akhundzada
Haibatullah Akhundzada Sarkarnama
Published on
Updated on

काबूल : अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता हाती घेतल्यापासून तालिबानचा सर्वेसर्वा असलेला शेख हैबतुल्ला अखुंजादा (Haibatullah Akhundzada) हा समोर आला नव्हता. त्याचा मृत्यू झाल्याही चर्चा सुरू होती. अखेर तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर अडीच महिन्यांनी तो सार्वजनिकरीत्या समोर आला आहे. यामुळे त्याच्या मृत्यूच्या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंदाहारमधील एका मशिदीत त्याने जाहीररीत्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. दारूल उलूम हकिम मदरसा या प्रसिद्ध असलेल्या मदरशात त्याने सैन्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यामुळे हैबतुल्लाचा मृत्यू झाल्याच्या सर्व अफवा असल्याचे समोर आले आहे. तालिबानचा सर्वेसर्वा असलेला शेख हैबतुल्ला याचा आधीच मृत्यू झाल्याची चर्चा होती. कारण तालिबानने सत्ता मिळवून एवढे दिवस झाल्यानंतरही तो समोर आलेला नव्हता.

यामुळे एकच प्रमुख नेता नसतानाही तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याची चर्चा सुरू होती. मुल्ला हैबतुल्ला हा 1990 मध्ये तालिबानमध्ये दाखल झाला. तो मूळचा कंदाहारचा असल्याचं सांगितलं जातं. सध्याही तो तिथंच असल्याचा दावा तालिबानकडून केला जात आहे. 1995 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर त्याच्यावर देशाचा गुन्ह्यांचा आलेख कमी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. 2015 मध्ये तालिबानच्या उपप्रमुख बनला होता. नंतर तो तालिबानचा प्रमुख बनला होता.

दरम्यान, तालिबानच्या प्रवक्त्यांनी अखुंजादा हा अफगाणिस्तानमध्येच असल्याचा दावा आधी केला होता. तो सुरवातीपासूनच कंदाहारमध्ये होता. तालिबानची सत्ता आल्यानंतर राजधानी काबूलमध्ये घडामोडींवर तो कंदाहारमधून लक्ष ठेवत होता. परंतु, तो सार्वजनिकरीत्या हजेरी लावत नसल्याने तालिबान समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. यामुळेच त्याच्या मृत्यूच्या अफवांना खतपाणी मिळाले होते. आता त्याने सार्वजनिक जीवनात हजेरी लावल्याने तालिबानमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Haibatullah Akhundzada
वानखेडे अनुसूचित जातीतीलच! राष्ट्रीय आयोगाच्या उपाध्यक्षांची क्लिनचिट

अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून हंगामी सरकारची घोषणा करण्यात आली असून, मोहम्मद हसन अखुंद हा सरकारचे नेतृत्व करीत आहे. देशाचे पंतप्रधानपद अखुंद याच्याकडे तर उपपंतप्रधानपद मुल्ला अब्दुल गनी बरादर याच्याकडे देण्यात आले आहे. तालिबानने नुकतेच मंत्रिमंडळ जाहीर केले. हे मंत्रिमंडळ अंतरिम असून त्यामध्ये आणखी काही मंत्र्यांच्या नावे समाविष्ट केली जाणार आहेत. पंतप्रधानपद मिळालेला अखुंद हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा सहकारी आहे. तो सध्या तालिबानचे महत्वाचे निर्णय घेणाऱ्या परिषदेचा प्रमुख आहे. त्याचं नाव संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीतही असल्याचं वृत्त आहे.

Haibatullah Akhundzada
वानखेडेंना क्लिनचिट देणारा राष्ट्रीय आयोगाचा उपाध्यक्ष भाजपचाच नेता!

लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबान्यांनी 15 ऑगस्टला सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले होते. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com