Arun Haldar, Sameer Wankhede and Nawab Malik
Arun Haldar, Sameer Wankhede and Nawab MalikSarkarnama

वानखेडेंना क्लिनचिट देणारा राष्ट्रीय आयोगाचा उपाध्यक्ष भाजपचाच नेता!

नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा केला जात आहे.
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून सातत्याने एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लिम असल्याचा दावा केला जात आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. आता वानखेडे यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांनी क्लिनचिट दिली आहे. याला मलिक यांनी आक्षेप घेतला आहे.

नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांनी जातीचे प्रमाणपत्र राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिलेले नाही. वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आहे. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ते मिळवले आहे. या विरोधात काही वकिलांना पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल केल्या आहेत. प्रमाणपत्राची वैधता ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची विभागवार समिती आहे.

शासकीय नोकरीतील 2019 पूर्वीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जात पडताळणी बंधनकारक आहे. आता केंद्र सरकारमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जात पडताळणी करणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय विभाग आणि जात पडताळणी समितीकडे या संदर्भात तक्रारी दाखल होती. आयोगाचे उपाध्यक्ष हलदर हे भाजप नेते आहेत. त्यांनी पदाची प्रतिष्ठा राखावी. त्यांनी प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा अधिकार नाही, असाही टोला मलिक यांनी लगावला.

समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच निकाहनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला होता. तसेच लग्नावेळी ते मुस्लिम होते, असा दावाही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी आज राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी हलदर यांच्याकडे एक अर्जही केला आहे. यानंतर हलदर यांनी वानखेडे यांना लगेचच क्लिनचिट दिली आहे. हलदर म्हणाले की, मी त्यांची तक्रार पाहिली आहे. मला वाटते की ते अनुसूचित जातीमधील असावेत. धर्मांतर केल्याचे सर्व आरोप वानखेडेंनी फेटाळून लावले आहेत.

Arun Haldar, Sameer Wankhede and Nawab Malik
वानखेडे अनुसूचित जातीतीलच! राष्ट्रीय आयोगाच्या उपाध्यक्षांची क्लिनचिट

समीर वानखेडे यांनी आपला विवाह मुस्लिम पध्दतीने व्हावा, अशी आईची इच्छा होती, असा दावा केला होता. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, मी जन्माने हिंदू असून दलित कुटूंबातील आहे. मी आजही हिंदू आहे. मी कधीही धर्मांतर केलेले नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून त्याचा मला अभिमान आहे. माझे वडिल हिंदू आहेत तर आई मुस्लिम होती. माझं दोघांवरही प्रेम करतो.

Arun Haldar, Sameer Wankhede and Nawab Malik
नवाब मलिकांनी सांगितलेला निघाला दुसराच किरण गोसावी!

माझं लग्न मुस्लिम पध्दतीने व्हावं, अशी आईची इच्छा होती. त्याच महिन्यात माझ्या लग्नाची नोंदणी विशेष विवाह कायद्यांतर्गत केली. कारण जेव्हा दोन वेगळ्या धर्मातील लोक लग्न करतात, त्यावेळी या कायद्यांतर्गत नोंदणी होते. त्यानंतर आम्ही कायदेशीर घटस्फोट घेतला. मी जर धर्मांतर केले असेल तर मलिकांनी तसे प्रमाणपत्र दाखवावे, पुरावा दाखवावा. माझे वडील विशेष कायद्यांतर्गत नोंदणीचे प्रमाणपत्र दाखवतील, असंही वानखेडे यांनी स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com