Agniveer Recruitment : अग्निवीरांसाठी खुशखबर ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सेवाकाळात दोन वर्षांची वाढ अन् कायमस्वरूपी भरतीची संधी

PM Modi Central Cabinet Decision On Agniveer Tenure Extension : भारतीय सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी दिवाळीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी खुशखबर दिली आहे.
PM Modi Central Cabinet Decision On Agniveer Recruitment
PM Modi Central Cabinet Decision On Agniveer RecruitmentSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News : भारतीय सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी अग्निपथ योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अग्निवीरांचा सेवाकाळ चार वर्षांवरून सहा वर्षे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे. या बदलामुळे अग्निवीरांना आणखी दोन वर्षे सैन्यदलात सेवा करण्याची संधी मिळू शकते. या निर्णयामुळे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सेवा देणाऱ्या अग्निवीरांच्या भवितव्याबाबत महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, नियमित सैन्य सेवेत दाखल होण्याच्या संधीबाबतही नव्या तरतुदीची चर्चा सुरू झाली आहे.

चार वर्षांऐवजी आता सहा वर्षे सेवा?

केंद्र सरकारने जून २०२२ मध्ये अग्निपथ योजना सुरू केली होती. या योजनेनुसार अग्निवीरांची चार वर्षांच्या कालावधीसाठी भरती केली जाते. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर कामगिरी आणि गुणवत्तेच्या आधारावर २५ टक्के अग्निवीरांना नियमित सैन्य सेवेत कायम ठेवण्याची तरतूद आहे. तर उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांना सेवेतून मुक्त केलं जातं. मात्र, आता या व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

त्यानुसार, चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांना आणखी दोन वर्षे सेवा करण्याचा पर्याय मिळू शकतो. त्यामुळे त्यांचा एकूण सेवाकाळ सहा वर्षांचा होण्याची शक्यता आहे. सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नियमित सैन्य सेवेत दाखल होण्यासाठी इच्छुक अग्निवीरांना निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, या निवडीसाठी नेमके निकष काय असतील, याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.

PM Modi Central Cabinet Decision On Agniveer Recruitment
Agniveer Scheme : अग्निवीरांच्या पुनर्वसनावर सरकारचे मौन : सत्ताधारी आमदाराचा थेट विधानसभेत सवाल; मुद्द्यावरच ठेवलं बोट

पहिल्या तुकडीतील १८ हजार अग्निवीरांचा सेवाकाळ संपण्याच्या मार्गावर

अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या पहिल्या तुकडीतील सुमारे १८ हजार अग्निवीरांचा चार वर्षांचा सेवाकाळ काही आठवड्यांत पूर्ण होणार होता. त्यानंतर हे जवान सशस्त्र दलातून बाहेर पडणार होते. अशा परिस्थितीत सेवाकाळ वाढवण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आतापर्यंतच्या नियमानुसार २५ टक्के अग्निवीरांना त्यांच्या कामगिरी आणि गुणवत्तेच्या आधारावर नियमित सेवेत संधी मिळणार होती. उर्वरित जवानांना चार वर्षांनंतर सेवेतून मुक्त व्हावं लागणार होतं. आता नव्या बदलानुसार त्यांनाही आणखी दोन वर्षे सेवा करण्याची संधी मिळू शकते.

अग्निवीरांच्या कामगिरीचा सकारात्मक परिणाम?

अग्निवीरांच्या कामगिरीबाबत सैन्यदलाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनीही यासंदर्भात माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे. अग्निपथ योजना सुरू करतानाच अग्निवीरांच्या कामगिरीचं नियमित मूल्यमापन केलं जाईल आणि वेळोवेळी योजनेचा आढावा घेतला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. पहिल्या तुकडीचा सेवाकाळ पूर्ण होण्याच्या टप्प्यावर असताना मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

PM Modi Central Cabinet Decision On Agniveer Recruitment
Agniveer permanent recruitment rules : अग्निवीर होणार 'परमनंट'! पण भारतीय लष्कराचे हे नवे मापदंड माहित आहेत का?

सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना दिलासा?

अग्निपथ योजनेतील चार वर्षांच्या सेवाकाळावरून सुरुवातीपासूनच तरुणांमध्ये अनेक प्रश्न होते. चार वर्षे देशसेवा केल्यानंतर नियमित सैन्यात संधी मिळाली नाही, तर पुढे काय करायचं, अशी चिंता अनेक उमेदवारांना होती. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रासारख्या काही राज्यांनी माजी अग्निवीरांना पोलीस भरती आणि इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण किंवा प्राधान्य देण्यासंदर्भात तरतुदी केल्या आहेत.आता सेवाकाळात दोन वर्षांची वाढ आणि नियमित सैन्य सेवेत निवडीची अतिरिक्त संधी मिळणार असल्याचा निर्णय प्रत्यक्षात लागू झाल्यास सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.