
एअर इंडिया अपघातात 269 मृत्यू: 12 जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडिया AI-171 विमान कोसळून 269 जणांचा मृत्यू झाला, यात 52 ब्रिटिश नागरिक होते.
मृतदेह बदलले गेले: तपासात उघड झालं की 12 ब्रिटिश कुटुंबांना चुकीचे मृतदेह देण्यात आले, यामुळे अंतिम संस्कार रद्द करावे लागले.
एअर इंडियावर निष्काळजीपणाचे आरोप: एका शवपेटीत दोन मृतदेह असल्याचंही समोर आलं असून, DGCA ने तातडीने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
Ahmedabad News : अहमदाबादमध्ये गेल्या महिन्यात 12 जून रोजी झालेल्या विमान मोठी दुर्घटना घडली होती.या दुर्घटनेत तब्बल 269 लोकांना जीव गमवावा लागला होता. अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-171 टेकऑफ घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले. अहमदाबाद (Ahedmedabd Air Plane Crash) येथे कोसळलेले हे विमान मेडिकल कॉलेज हॉस्टेलला धडकले होते. त्यामुळे हा अपघात झाला होता. यात 270 जणांचा मृत्यू झाला होता.त्यात 52 ब्रिटिश नागरिकांचाही समावेश होता.पण आता या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अहमदाबाद अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेक प्रवाशांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात मोठी अडचण निर्माण झाली होती. अखेर डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आणि त्यानंतर मृतदेहांना कुटुंबाकडे पाठवण्यात आले होते.
मात्र, आता या अपघातात धक्कादायक बाब समोर आली असून मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबियांना मिळाले नसल्याचं समोर आलं आहेत. यात एअर इंडियाचा (Air India) चीड आणणारा निष्काळजीपणानंही खळबळ उडवली आहे. कारण एअर इंडियानं लंडनमधील 12 कुटुंबांना चुकीचे मृतदेह पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक बाब लंडनमधील तपासणीतून पुढे आली आहे.
अहमदाबाद दुर्घटनेमधील 12 ब्रिटिश नागरिकांच्या मृतदेहांचे अवशेष परत एअर इंडियाकडून पाठवण्यात आले होते. याचवेळी 12 नातेवाईकांना चुकीचे मृतदेह मिळाल्याचं समोर आलं आहे. यावेळी काहींना मृतदेह मिळाले आहेत मात्र ते दुसऱ्याचे आहेत. हा एअर इंडिया कंपनीचा मोठा निष्काळजीपणा असून याबाबत कुटुंबांना स्पष्टीकरण द्यायला हवं, असंही वकील जेम्स हीली प्रॅट यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे हे मृतदेह दुसऱ्या व्यक्तीचे आहेत तर मग या लोकांचे मृतदेह कुठे आहेत? यामुळे दुसऱ्या नातेवाईकांनाही चुकीचे मृतदेह तर गेले नाहीत ना असा मुद्दा वकील हीली यांनी उपस्थित केला आहे. एका महिन्यापासून ब्रिटिश कुटुंबांच्या घरी आहे, या लोकांना त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह परत हवे आहेत. मात्र अनेकांना त्यांच्या प्रियजनांचे अवशेष मिळालेले नाहीत,असंही त्यांनी म्हटलं आहे.
या दुर्घटनेनंंतर परदेशातील मृतदेहांपैकी एकाच शवपेटीत एकापेक्षा जास्त व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला होता. हे सगळे मृतदेह अंत्संस्कारापूर्वी वेगळे करण्याते आले आणि मृतदेहांची ओळख पटल्यानंतर परंपरेनुसार त्यांना दफन करण्यात आल्याचीही माहिती पुढं आली आहे.
एअर इंडियाने सर्वात मोठी अॅक्शन घेतली आहे. तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाका, असे निर्देश डीजीसीए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालकाकडून देण्यात आले आहेत. या अपघात प्रकरणाची चौकशी सुरु होती. यामध्ये प्रथमदर्शनी विमान वाहतूक सुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
1. अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला?
एकूण 269 जणांचा मृत्यू झाला, त्यात 52 ब्रिटिश नागरिक होते.
2. एअर इंडियाने नेमकी कोणती चूक केली?
12 ब्रिटिश कुटुंबांना चुकीचे मृतदेह पाठवले गेले.
3. मृतदेहांची ओळख कशी पटवली गेली होती?
डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्यात आली.
4. एअर इंडियावर कोणती कारवाई झाली?
DGCA ने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामावरून दूर केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.