NCP Shiv Sena Alliance : विनय कोरे यांना बालेकिल्ल्यातच धक्का; महायुतीकडून 'करेक्ट कार्यक्रम', राष्ट्रवादी-शिवसेनेने टाकला डाव...

Political News: आमदार चंद्रदीप नरके यांनी राष्ट्रवादी व शिवसेना पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगत आमचाच सभापती व उपसभापती करणार असल्याचे जाहीर केले.
Vinay Kore, Chandradeep Narake
Vinay Kore, Chandradeep Narake Sarkarnama
Published on
Updated on

kolhapur News : कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये महायुती सत्ता स्थापन करत जनसुराज्य शक्तीला ही सोबत घेऊन पुढे जाणार आहे. मात्र पन्हाळा पंचायत समितीमध्ये महायुतीनेच जनसुराज्य शक्तीला खड्याप्रमाणे बाजूला काढले आहे. जनसुराज्य शक्तीच्या बालेकिल्ल्यातच जनसुराज्य शक्तीला पंचायत समितीच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. आगामी राजकारणात जनसुराज्य शक्तीला बालेकिल्ल्यातच कमी करण्याचा प्रयत्न महायुतीने केला आहे. त्यामुळे आमदार विनय कोरे यांना हा धक्का समजला जातो.

जिल्हा परिषद, पंचायत सामितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पन्हाळा तालुक्यासाठी अस्तित्वात आलेली राष्ट्रवादी व शिवसेनेची युती निकालानंतरही कायम राहणार आहे. दोघांच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या सात आहे. त्यामुळे आमचाच सभापती व उपसभापती करणार असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी राष्ट्रवादी-शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर उपस्थित होते.

आमदार चंद्रदीप नरके यांनी राष्ट्रवादी व शिवसेना पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगत आमचाच सभापती व उपसभापती करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी सत्तेचे समीकरण कसे असणार,पहिला सभापती कोणाचा होणार, या प्रश्नांना उत्तर देताना नरके यांनी आमची युती निवडणुकीनंतर झालेली नाही. ती निवडणुकीत पूर्वीपासूनच अस्तित्वात आलेली होती. त्यामुळे आम्ही दोघेही एक मताने निर्णय घेणार असल्याचा आमदार नरके यांनी सांगितलं.

Vinay Kore, Chandradeep Narake
Government exam fee relief : पालकांसाठी महत्वाची बातमी; सरकारने परीक्षा फी केली माफ, ‘या’ विद्यार्थ्यांना होणार फायदा...

पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ४, राष्ट्रवादी ३, जनसुराज्य ४, अपक्ष १ असे संख्याबळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आसुर्लेकर यांचे पन्हाळा होमग्राउंड आहे.

Vinay Kore, Chandradeep Narake
Maharashtra Government : सरकारी कार्यालयात चाललाय, मग ही बातमी वाचाच; फडणवीसांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचं वाढवलं टेन्शन...

महायुती एकत्र असताना विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्तीच्या विरोधात असुरलेकर गटाने काम केले होते. तर पुन्हा एकदा पंचायत समितीच्या राजकारणात जनसुराज्य शक्ती बाहेर ठेवत असल्याने आगामी काळात त्याचा फटका बसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com