Ram Mandir CEO : 'ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला अद्दल घडविणाऱ्या एअर मार्शल जितेंद्र मिश्रांच्या हाती राम मंदिराची कमान! बनले पहिले CEO

Air Marshal Jitendra Mishra appointed Ram Mandir CEO : ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे एअर मार्शल जितेंद्र मिश्रा आता राम मंदिराचे पहिले CEO बनले आहेत. या ऐतिहासिक नियुक्तीची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Jitendra Mishra first CEO of Ram Mandir
Jitendra Mishra first CEO of Ram MandirSarkarnama
Published on
Updated on

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय वायुसेनेतील माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टच्या पहिल्या पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राम मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याकडे मंदिर व्यवस्थापनाची इतकी मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेतील तब्बल 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आता ते राम मंदिराच्या व्यवस्थापनाची नवी जबाबदारी सांभाळणार आहेत.

राम मंदिराचा विस्तार, भाविकांची वाढती संख्या आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर अनुभवी, शिस्तप्रिय आणि सक्षम प्रशासकाची गरज निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर कठोर निवड प्रक्रियेनंतर एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

Jitendra Mishra first CEO of Ram Mandir
Shiv Sena News : शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला! राजू राठोड यांचे अकाली निधन

CEO पदासाठी उच्चस्तरीय निवड समिती स्थापन करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी आणि तज्ज्ञ सदस्य सुरेश हावरे यांचा या समितीत समावेश होता. सुरुवातीला 16 पात्र उमेदवारांची निवड करून त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर 6 प्रमुख उमेदवारांचे पॅनेल तयार करण्यात आले. ट्रस्ट अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व बाबींचा विचार करून जितेंद्र मिश्रा यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला.

कोण आहेत जितेंद्र मिश्रा?

जितेंद्र मिश्रा हे मूळचे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील भोपतपुरा गावचे रहिवासी आहेत. भारतीय वायुसेनेतील त्यांच्या धाडसी कारकिर्दीमुळे त्यांची देशभरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 6 डिसेंबर 1986 रोजी ते भारतीय वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये दाखल झाले होते. आपल्या लष्करी कारकिर्दीत त्यांनी 3000 हून अधिक तासांचे उड्डाण केले असून 18 हून अधिक प्रकारची लढाऊ विमाने, मालवाहू विमाने आणि हेलिकॉप्टर उडविण्याचा अनुभव त्यांच्या नावावर आहे.

1999 च्या कारगिल युद्धातील ऑपरेशन सफेद सागरमध्येही जितेंद्र मिश्रा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मिराज 2000 लढाऊ विमानांमध्ये लेझर-गाइडेड बॉम्बची अत्याधुनिक प्रणाली बसविणाऱ्या विशेष तांत्रिक टीममध्ये ते प्रमुख सदस्य होते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आलेल्या अचूक हल्ल्यांचा टायगर हिल आणि मुंथो ढालो परिसरातील शत्रूच्या ठिकाणांवर मोठा परिणाम झाला होता.

मे 2025 मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरवेळी मिश्रा भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एयर कमांडचे प्रमुख, म्हणजेच Air Officer Commanding-in-Chief म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलाने पाकिस्तानकडून निर्माण झालेल्या आव्हानांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. हवाई सुरक्षेच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

Jitendra Mishra first CEO of Ram Mandir
Lawyers Recruitment : वकिलांसाठी सुवर्णसंधी! कृषी विभागात मोठी भरती; एका खटल्यासाठी मिळणार तब्बल 50,000 कमाईची संधी!

मिश्रा यांनी भारतीय हवाई दलात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय लष्करी सेवेसाठी त्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

आता भारतीय हवाई दलातील शिस्त, नियोजन आणि नेतृत्वाचा दीर्घ अनुभव घेऊन एअर मार्शल जितेंद्र मिश्रा अयोध्येतील राम मंदिराच्या व्यवस्थापनात नवी भूमिका पार पाडणार आहेत. ऑपरेशन सिंदूरमधील त्यांच्या नेतृत्वानंतर राम मंदिराचे पहिले CEO म्हणून झालेली त्यांची नियुक्ती विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com