BJP-Akali Dal Alliance: 2019 ला ठाकरेंनी केलेली चूक बादलांनी टाळली; भाजपसोबत युतीची 'डील' फायनल करण्यापूर्वीच शहांसमोर ठेवल्या दोन मोठ्या अटी...

Punjab Politics: पंजाबच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप - अकाली दलाच्या युतीची घोषणा अमित शाह आणि सुखबीर सिंग बादल यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.24) करण्यात आली. मात्र, यावेळी अमित शाहांसोबत युतीची बोलणी करताना सुखबीर सिंग बादल यांनी अकाली दलासाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या 2 प्रमुख अटी मान्य करून घेतल्या आहेत.
BJP -Akali Dal Alliance
BJP - Akali Dal Alliance Sarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News: भाजपनं पुढील वर्षी होत असलेल्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 2029 च्या केंद्रातील सत्तेचा राजमार्ग डोळ्यांसमोर ठेवून भाजप विशेषत:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी या पाच महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे. या निवडणुकांसाठी भाजपचे राजकीय चाणक्य अमित शाह यांनी पंजाबमध्ये आपला पहिला मोठा डाव टाकला आहे. एनडीएतील जुना सहकारी अकाली दलासोबत युतीची घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी मात्र, माजी मुख्यमंत्री व अकाली दलाचे प्रमुख नेते सुखबीर सिंग बादल यांनी उद्धव ठाकरेंनी 2019 महाराष्ट्रात केलेली चूक टाळली आहे.

पंजाबच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप - अकाली दलाच्या युतीची घोषणा अमित शाह आणि सुखबीर सिंग बादल यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.24) करण्यात आली. मात्र, यावेळी अमित शाहांसोबत युतीची बोलणी करताना सुखबीर सिंग बादल यांनी अकाली दलासाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या 2 प्रमुख अटी मान्य करून घेतल्या आहेत.

या बैठकीत पंजाबमधील भाजपसोबतच्या युतीत मोठा भाऊ हा अकाली दलच असेल. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत अकाली दल हा पक्ष सर्वाधिक जागा लढवण्यासाठीचा प्रमुख दावेदार असणार पहिली अट होती. दुसरी अट ही निकालानंतर पंजाबच्या जनतेनं भाजप-अकाली दलाला सत्तेचा कौल दिला तर मुख्यमंत्री हा अकाली दलाचा असा शब्दही अमित शहांकडून घेण्यात बादल यशस्वी झाल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 मध्ये जी मोठी राजकीय उलथापालथ त्यावेळी पाहायला मिळाली त्याचं मुख्य कारण हे भाजप-शिवसेना युती तुटण्याचं होतं. राज्यात 25 वर्षे भाजपसोबत राहिलेल्या शिवसेनेनं निवडणुकीपूर्वी हॉटेल ब्लूसी अमित शहांसह झालेल्या बैठकीत दिलेला मुख्यमंत्री पदाचा शब्द फिरवल्याचा आरोप करत युती तोडली होती. त्यानंतर शिवसेनेनं थेट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजपला विरोधी बाकावर बसवत शिवसेनेनं महाविकास आघाडी सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पद मिळवलं होतं.

BJP -Akali Dal Alliance
BJP-Akali Dal Alliance : मोठी बातमी! भाजपला सोडून गेलेला मित्रपक्ष परतला, अमित शाहांच्या उपस्थितीत युतीची घोषणा!

आता पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथील प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेल्या अकाली दलानं भाजपसोबत युतीच्या बैठकीत सर्व गोष्टी आधीच स्पष्ट केल्या आहेत. पंजाबमधील 2027 विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर कोणत्याही वाद-विवादांची जोखीम न पत्करण्याच्या उद्देशानं सुखबीर सिंग बादल यांनी अमित शहांसोबतच्या युतीच्या मुख्य बैठकीत दोन मुख्य अटी मान्य करुन घेतल्या आहेत.

सहा वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलनानंतर भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाने पुन्हा भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आज पत्रकार परिषद घेत जाहीर करण्यात करण्यात आला. दिल्लीमध्ये ही पत्रकार परिषद पार पडली.

BJP -Akali Dal Alliance
Operation Tiger : पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंचा नगराध्यक्ष शिंदेंच्या बैठकीला, संदेश पारकरांनी भूमिका स्पष्ट केली; उदय सामंतांकडून मोठी हिंट

मागील दहा वर्षांपासून शिरोमणी अकाली दल हा पंजाबच्या सत्तेपासून बाहेर आहे. पंजाबमधील भाजपचे सर्व वरिष्ठ नेते आज दिल्लीत उपस्थित आहेत. अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन नबीन हे देखील उपस्थित होते.

शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्या 1997, 2002, 2007, 2012 और 2017 या पाच विधानसभा निवडणुका एकत्र युतीत लढल्या होत्या. आणि 1997, 2007 और 2012 च्या निवडणुकीत सत्ता मिळावली होती. या निवडणुकांमध्ये भाजपकडे सहा टक्के मत होती. तर, अकाली दलाकडे 18 टक्के मतांचा वाटा होता. मात्र, युती तुटल्यानंतर या मतांमध्ये फूट पडल्याची दिसते. तसेच अकाली दलाची मते ही 'आप'कडे वळल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.