Operation Tiger : पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंचा नगराध्यक्ष शिंदेंच्या बैठकीला, संदेश पारकरांनी भूमिका स्पष्ट केली; उदय सामंतांकडून मोठी हिंट

Uday Samant Statement On Operation Tiger And Shivsena UBT Sandesh Parkar : राज्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू झाली असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक नेते तथा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला हजेरी लावल्याचे समोर आले आहे.
Operation Tiger Starting From Konkan? Kankavli Municipal President Sandesh Parkar; Uddhav Thackeray, Eknath Shinde And Uday Samant
Operation Tiger Starting From Konkan? Kankavli Municipal President Sandesh Parkar; Uddhav Thackeray, Eknath Shinde And Uday SamantSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sindhudurg News : राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा जोर धरत असतानाच तळकोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या नगराध्यक्षांच्या बैठकीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक नेते तथा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी हजेरी लावल्याचे समोर आले आहे. यामुळे आगामी ऑपरेशन टायगरची सुरुवात तळकोकणातून होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीदेखील याबाबत हिंट दिल्याने तळकोकणासह राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या नगराध्यक्षांच्या बैठकीला थेट ठाकरे गटाचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी हजेरी लावली. फक्त हजेरीच लावली नाही, तर ओपनिंग बॅट्समन म्हणून जोरदार बॅटिंगदेखील केली आहे. यामुळे संदेश पारकर हे शिंदेंच्या शिवसेनेत जातील, असा तर्क लावला जात आहे.

दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या चर्चेला अधिकच हवा दिली आहे. संदेश पारकर शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिले. त्यांनी ओपनिंग बॅट्समन म्हणून भाषण केले असेल, तर त्यातूनच सर्वांनी अर्थ समजून घ्यावा, असे सूचक विधान करत आता तुम्हीच समजून घ्या, असे म्हटले आहे.

Operation Tiger Starting From Konkan? Kankavli Municipal President Sandesh Parkar; Uddhav Thackeray, Eknath Shinde And Uday Samant
Operation Tiger : भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार? उदय सामंतांच्या सूचक विधानाने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण!

तसेच त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’बाबत सध्या आम्ही बोलणार नाही. दुष्काळामुळे सध्या त्यावर भाष्य टाळत आहोत, असे विधानही उदय सामंत यांनी केले आहे. तर एकनाथ शिंदे ऑपरेशन कधी करतात, हे कोणालाही कळत नाही. खासदार ओमराजे निंबाळकर माझ्या बाजूला आहेत. त्यांचे ऑपरेशन कधी झाले, हे देखील कोणाला कळले नाही, असे म्हणत त्यांनी आगामी ‘ऑपरेशन टायगर’बाबत इशारा दिला आहे. यामुळे संदेश पारकर हे शिंदे गटात जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, याबाबत संदेश पारकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी यापूर्वीदेखील एका बैठकीला गेलो होतो. कालच्या बैठकीला महाराष्ट्रातील सर्वच नगराध्यक्षांना निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीत नगरपालिका क्षेत्रातील प्रश्नांवर चर्चा झाली. तसेच मी शिंदे यांच्या शिवसेनेच्या मदतीने शहरविकास आघाडीच्या माध्यमातून कणकवलीचा नगराध्यक्ष झालो आहे. त्यामुळेच कणकवली शहराच्या विकासासाठी बैठकीला उपस्थित होतो.

Operation Tiger Starting From Konkan? Kankavli Municipal President Sandesh Parkar; Uddhav Thackeray, Eknath Shinde And Uday Samant
Operation Tiger : उद्धव ठाकरेंचे आमदार फुटणार ? आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'ऑपरेशन टायगरआधी ....'

यापूर्वी मी अनेक निर्णय जाहीरपणे घेतले आहेत. आताही कोणताही निर्णय लपूनछपून होणार नाही. शहरविकास आघाडीच्या माध्यमातून मी नगराध्यक्ष झालो आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन विकासासाठी निधी मागणे ही माझी जबाबदारी आहे. म्हणूनच मी बैठकीला उपस्थित राहिलो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र, या बैठकीनंतर पारकर यांनी गुपचूप काढता पाय घेतल्याने आणि सामंत यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे आता पारकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.