Chandrababu Naidu : नववर्षाचे मुख्यमंत्र्यांकडून गौतम अदानींना गिफ्ट, 'त्या' आरोपांमधील हवाच काढली!

Chandrababu Naidu gautam adani adani green energy :अमेरिकेत अदानी ग्रुप कंपनी आणि चेअरमन यांच्यावर लाचखोरीचे आरोप समोर आल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी 22 नोव्हेंबर 2024 रोजी आंध्र प्रदेशच्या विधानसभेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
gautam adani
gautam adanisarkarnama
Published on
Updated on

Chandrababu Naidu News: अदानी ग्रुप कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडवर अमेरिकेत आरोपा करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशात कंत्राट मिळवण्याबाबत हे आरोप करण्यात आले होते. याबात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, जोपर्यंत या प्रकरणी ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले, जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही ग्रुप कंपनीला दिलेल्या कंत्राटातून माघार घेऊ शकत नाही. पुरावे मिळाल्यानंतरच ठोस कारवाई केली जाईल.

gautam adani
America Truck Attack : अमेरिकेतील 'ट्रक अ‍ॅटक'मधील मृतांची संख्या 15 वर अन् हल्लेखोराचा थेट 'ISIS'शी संबंध!

दरम्यान, अमेरिकेत अदानी ग्रुप कंपनी आणि चेअरमन यांच्यावर लाचखोरीचे आरोप समोर आल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी 22 नोव्हेंबर 2024 रोजी आंध्र प्रदेशच्या विधानसभेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आंध्र प्रदेश सरकार अदानी कंपनीच्या ऐवजी दुसऱ्या कंपन्यांचा पर्यायी विचार करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

अदानी समुहावर नेमके काय आरोप?

अमेरिकेमध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि इतर सात जणांवर भारतातील ओडिशा, तामिळनाडू, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील अधिकाऱ्यांना 2021 ते 2022 दरम्यान सौर प्रकल्प सुरक्षित करण्यासाठी 265 दशलक्ष डाॅलरची लाच दिल्याचा आरोप ठेवला आहे.

gautam adani
Tuljapur Sarpanch Attack : तुळजापुरातील सरपंच हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; 'या' कारणासाठी बनाव रचल्याचे झाले उघड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com