Assembly Election 2023 : मते काँग्रेसला, सत्ता भाजपला; पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये घडलं तरी काय?

Congress News : मतांमध्ये घेतलेली ही आघाडी काँग्रेसला विजयामध्ये परावर्तित करता आली नाही.
BJP-Congress
BJP-CongressSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election 2023 : लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल भाजपने जिंकत बाजी मारली. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेसला आस्मान दाखविले, तर तेलंगणामध्ये काँग्रेसने बाजी मारली. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी पाच राज्यांतील एकूण मते पाहता काँग्रेसने आघाडी घेतली आहे. मात्र, मतांमध्ये घेतलेली ही आघाडी काँग्रेसला विजयामध्ये परावर्तित करता आली नाही. (Congress lead in votes in five states assembly election)

पाच राज्यांत मिळालेले मतदान पाहता भाजपला 4 कोटी 81 लाख 68 हजार 987 एकूण मते मिळाली आहेत तर पाचही राज्यांत मिळून काँग्रेसला 4 कोटी 92 लाख 24 हजार 20 एकूण मते मिळाली. ही आकडेवारी पहिली तर काँग्रेसला भाजपपेक्षा 10 लाख 55 हजार 33 जास्त मते आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP-Congress
Nagpur Winter Session : विदर्भाचे प्रश्न फक्त पाच दिवसांच्या अधिवेशनात कसे सुटतील? : जयंत पाटील

मध्य प्रदेशात भाजपला 35 लाख मते जास्त

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत 230 जागांपैकी भाजपला 163 तर काँग्रेसला 66 जागा मिळाल्या आहेत. भाजपला मिळालेली एकूण मते 2 कोटी 11 लाख 16 हजार 197 मिळाली. तर काँग्रेसला 1 कोटी 75 लाख 71 हजार 582 एकूण मते मिळाली. मध्य प्रदेशात भाजपला काँग्रेसपेक्षा 35 लाख 44 हजार 615 मते अधिक मिळाली.

राजस्थानमध्ये भाजपची आघाडी

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपला 1 कोटी 65 लाख 24 हजार 787 एकूण मते मिळाली तर काँग्रेसला 1 कोटी 56 लाख 67 हजार 947 एकूण मते मिळाली. राजस्थानमध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा 8 लाख 56 हजार 840 मते जास्त आहेत. या ठिकाणी एकूण 199 जागांपैकी भाजपला 115 तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या आहेत.

BJP-Congress
Karmala Sugarcane Issue : शिंदे-सावंतांवर शेतकऱ्यांचा भरोसा नाय का? करमाळ्यातील ऊस पवारांच्या कारखान्यांना...

छत्तीसगडमध्ये भाजप पुढे

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत 90 जागांपैकी भाजपला 54 तर काँग्रेसला 35 जागा मिळाल्या. याठिकाणी भाजपला 72 लाख 34 हजार 968 एकूण मते मिळाली तर काँग्रेसला 66 लाख 02 हजार 586 एकूण मते मिळाली. याठिकाणी भाजपला काँग्रेसपेक्षा 6 लाख 32 हजार 382 मते अधिक आहेत.

तेलंगणात काँग्रेसची आघाडी

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने यश संपादन केले. 119 जागांपैकी भाजपला 8 तर काँग्रेसला 64 एवढ्या जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी भाजपला 32 लाख 57 हजार 511 एकूण मते मिळाली तर त्या तुलनेत काँग्रेसला 92 लाख 35 हजार 792 इतकी एकूण मते मिळाली. तेलंगणमध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा 59 लाख 78 हजार 281 मते अधिक मिळाली आहेत.

BJP-Congress
Backward Classes Commission : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देणार?; दोन मंत्र्यांच्या दबावाची चर्चा

मिझोरममध्येही मतांमध्ये काँग्रेसची बाजी

मिझोरम विधानसभा निवडणुकीत भाजपला 35 हजार 524 एकूण मते मिळाली तर काँग्रेसला 1 लाख 46 हजार 113 एकूण मते मिळाली. मिझोरममध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा 1 लाख 10 हजार 589 मते जास्त आहेत. या ठिकाणी एकूण 40 जागांपैकी भाजपला 2 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे.

BJP-Congress
Solapur MIM News : तेलंगणातील यशाचे ‘टॉनिक’ एमआयएमला सोलापुरात आमदारकी मिळवून देणार...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com