Bangladesh China Relations : तिथे चीनशी हातमिळवणी, इथे शेख हसीना यांच्या 'घर वापसी'ची तयारी; भारताला डावलून बांगलादेशच्या नव्या पंतप्रधानांचा चीन दौरा

Bangladesh foreign policy shift from India to China : बांगलादेशच्या नव्या नेतृत्वाचा चीन दौरा, शेख हसीना यांच्या संभाव्य 'घर वापसी'ची चर्चा आणि भारत-बांगलादेश संबंधांवरील परिणाम याचा सविस्तर आढावा.
Bangladesh prime minister China visit
Bangladesh prime minister China visitSarkarnama
Published on
Updated on

Bangladesh China diplomatic ties: बांग्लादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या परदेश दौऱ्यासाठी चीनची निवड केल्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांपासून बांग्लादेशच्या प्रमुख नेत्यांचा पहिला अधिकृत दौरा भारतात होत असे. मात्र यावेळी चीनला प्राधान्य देण्यात आल्याने या निर्णयाकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.

चीन दौऱ्यात संरक्षण, व्यापार, पायाभूत सुविधा आणि सामरिक सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तीस्ता नदीशी संबंधित प्रकल्प आणि मोंगला बंदराच्या विकासामध्ये चीनची भूमिका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bangladesh prime minister China visit
IPS officer resignation : IPS अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा; 13 वर्षांचा ड्रीम जॉब झटक्यात सोडला : पोलीस दलात खळबळ

या घडामोडींमुळे भारताच्या सुरक्षाविषयक आणि भूराजकीय हितसंबंधांवर काय परिणाम होईल, याबाबत तज्ञ बारकाईने निरीक्षण करत आहेत. विशेषतः ईशान्य भारताला देशाच्या इतर भागांशी जोडणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांग्लादेश-चीन जवळीक महत्त्वाची मानली जात आहे.

तसेच विश्लेषकांचे मत आहे की चीनशी संबंध मजबूत करताना बांग्लादेश भारताशी असलेले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध दुर्लक्षित करू शकत नाही. त्यामुळे तारिक रहमान यांचा संभाव्य भारत दौरा दोन्ही देशांमधील विश्वास आणि सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. बांग्लादेश भारत आणि चीन या दोन्ही देशांशी संतुलित संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेतही मिळत आहेत.

दुसरीकडे, बांग्लादेशच्या राजकारणात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या परत जाणाच्या चर्चा पुन्हा जोर धरत आहे. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांमध्ये हालचाली वाढल्या असून पक्ष पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. शेख हसीना यांनी वर्षअखेरीपूर्वी देशात परतण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

Bangladesh prime minister China visit
Nashik News : 15 दिवसांपूर्वीच मुलाचा वाढदिवस साजरा केला अन् पुन्हा देशसेवेसाठी गेले ; पण नियतीने घात केला, पॅरा कमांडोचा करुण अंत

सध्या बांग्लादेशसमोर आर्थिक आव्हाने, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आणि राजकीय तणाव अशी अनेक संकटे आहेत. तरीही भारतविरोधी वातावरणात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. भारताने व्हिसा सेवा पुन्हा सुरू केल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी अर्ज केल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दिशेने सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com