Nashik News : 15 दिवसांपूर्वीच मुलाचा वाढदिवस साजरा केला अन् पुन्हा देशसेवेसाठी गेले ; पण नियतीने घात केला, पॅरा कमांडोचा करुण अंत

Para Commando Shaqib Pathan Death : नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावातील रहिवासी असलेल्या पॅरा कमांडोचा नियतीने घात केला आहे. सोनांबे गावावर शोककळा पसरली आहे.
Para Commando Shaqib Pathan Death
Para Commando Shaqib Pathan Death Sarkarnama
Published on
Updated on

Para Commando Shaqib Pathan Death : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलाच्या ४११ पॅरा युनिटमध्ये कार्यरत असलेले पॅरा कमांडो शाकिब पिरामद पठाण (वय ३२) यांचे आग्रा येथे कर्तव्य बजावत असताना विजेचा धक्का बसल्याने निधन झाले. एका शूर जवानाच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिन्नर तालुक्यात आणि सोनांबे गावावर शोककळा पसरली आहे.

सैन्य दलाच्या आग्रा येथील निवास परिसरात काम करत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र झटका बसला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या अत्यंत दुर्दैवी घटनेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुजोरा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पॅरा कमांडो शाकिब पठाण हे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच आपली सुट्टी संपवून पुन्हा देशसेवेसाठी कर्तव्यावर हजर झाले होते. सुट्टीवरून परतल्यानंतर काही दिवसांतच काळाने त्यांच्यावर झडप घातली. आग्रा येथील सैन्य दलाच्या निवास परिसरात काम करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार करंट लागला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

Para Commando Shaqib Pathan Death
नाशिक कुंभमेळ्यापूर्वी साधू-महंतांचे शस्त्र परवान्यासाठी अर्ज; नेमके काय आहे प्रकरण?

त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सोनांबे येथील जनता विद्यालय तर बारावीपर्यंतचे शिक्षण सिन्नर महाविद्यालयात झाले. त्यांनी गावातील पर्सनल करिअर अकॅडमीमध्ये सैनिकी प्रशिक्षण घेतले आणि भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न साकार केले.

शाकीब पठाण यांनी तब्बल दहा वर्षे देशसेवा बजावली आहे, गेले दोन महिने ते सुट्टीवर गावी आले होते. या काळात त्यांनी मुलगा साजनचा पहिला वाढदिवस, मुस्लिम परंपरेतील 'हकिका' विधीसह मोठ्या आनंदात साजरा केला होता. शांत, मनमिळावू, शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष असा त्यांचा स्वभाव सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, मुलगा साजन आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

Para Commando Shaqib Pathan Death
नाशिकच्या 1 हजार 128 अधिकाऱ्यांचा काळजाला भिडणारा निर्णय, सर्वत्र होतय कौतुक

सैन्य दलातील आवश्यक शासकीय व लष्करी सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव सोमवारी (ता. ६) लष्करी सन्मानाने सोनांबे येथे आणण्यात येणार असल्याची व मुस्लिम धर्माच्या रीती-रिवाजांनुसार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती देण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com