BJP Politics: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अन् गमावलेलं 'बांकीपूर'; एकाच महिन्यांत भाजपला दोन मोठे धक्के; 'ओव्हर कॉन्फिडन्स'चा फटका

Bihar Election 2026 : प्रशांत किशोर यांनी बांकीपूर पोटनिवडणकीत भाजप उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा 19 हजार मतांनी पराभव केला आहे. मात्र, याच पोटनिवडणुकीसाठी ज्यावेळी प्रशांत किशोर यांनी उमेदवारी जाहीर केली, तेव्हा भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी खोचक टिप्पणी केली होती.
Prashant Kishor Vs Bjp  .jpg
Prashant Kishor Vs Bjp .jpgSarkarnama
Published on
Updated on

Bihar News: 'कॉक्रोच जनता पार्टी'नं कथित पेपरफुटीविरोधातील पुकारलेल्या आंदोलनामुळे देशभरात राजकीय वातावरण तापलं. या आंदोलनामुळे विरोधकांनाही मोठं बळं मिळालं होतं. सीजेपीचं आंदोलन, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे आधीच 'बॅकफूट'ला गेलेल्या भाजपला आता बिहार, मध्य प्रदेश या दोन राज्यांमधील पोटनिवडणुकीत मोठा फटका बसला आहे. त्यातही बिहारमध्ये भाजपला ओव्हर कॉन्फिडन्स नडल्याचं दिसून येत आहे.

बिहारमधील बांकीपूर या भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बाजी पलटवली आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन ज्या पाचवेळा मतदारसंघात आमदार म्हणून काम केले आहे. ते राज्यसभेवर निवडून आल्यानंतर याच बांकीपूर विधानसभेच्या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडली. याच निवडणुकीत एकेकाळी भाजपला सर्वात मोठा विजय मिळवून दिलेल्या प्रशांत किशोर याच पक्षाला धक्का देत दमदार विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे.

प्रशांत किशोर यांनी बांकीपूर पोटनिवडणकीत भाजप उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा 19 हजार मतांनी पराभव केला आहे. मात्र, याच पोटनिवडणुकीसाठी ज्यावेळी प्रशांत किशोर यांनी उमेदवारी जाहीर केली, तेव्हा भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी खोचक टिप्पणी केली होती.

रविशंकर प्रसाद यांनी बांकीपूरमधून भाजपनं कुत्र्या-मांजराला जरी उमेदवारी दिली, तरी ते जिंकून येतील असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचाच मोठा फटका भाजपला या पोटनिवडणुकीत बसल्याचं दिसून येत आहे.

Prashant Kishor Vs Bjp  .jpg
Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी खूशखबर! खात्यात थेट जमा होणार 4000? 'नमो शेतकरी' योजनेबाबत सरकारची नवी अपडेट!

जनसुराजच्या प्रशांत किशोर यांनीही पोटनिवडणुकीतील प्रचारावेळी रविशंकर प्रसाद यांचं हेच वक्तव्य उचलून धरलं होतं. त्यांनी मतदारसंघात प्रचारावेळी मतदारांसमोर तुम्हाला भाजप कशाप्रकारे गृहीत धरतंय हेच दाखवून दिलं.

बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती अत्यंत चुरशीची बनली असून, येथे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात थेट व रंगतदार लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रशांत किशोर यांची बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपविरोधातील 'अंडर करंट'चा फायदा उचलण्याची खेळी यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळत आहे.

Prashant Kishor Vs Bjp  .jpg
Prashant Kishor: आमदारकीची माळ गळ्यात पडताच प्रशांत किशोर बरसले! "गुन्हेगार मुख्यमंत्री... भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला बिहारच्या जनतेचा इशारा"

संरक्षण मंत्री व भाजप वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी जून 2015 मध्ये आमच्या सरकारमध्ये मंत्र्यांचे राजीनामे होत नाहीत, हे यूपीए सरकार नसून एनडीए सरकार आहे असल्याचं म्हटलं होतं. नुकताच मोदी सरकारमधील केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कॉक्रोच जनता पार्टीच्या तीव्र आंदोलनामुळे अलीकडे राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर राजनाथ सिंह यांचा जुना व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आणि मोठ्या प्रमाणावर व्हायरलही झाला आहे.

एकाच महिन्यात भाजपला बसलेल्या प्रधानांचा राजीनामा आणि बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीतील पराभव अशा दोन धक्क्यांमुळे ओव्हर कॉन्फिडन्समधील केलेले दोन वक्तव्य अंगलट आल्याचं दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com