Bihar cabinet expansion : बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा सस्पेन्स संपला! सम्राट चौधरींच्या 'सेनेत' कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य यादी

Bihar cabinet expansion probable candidates: बिहार मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स लवकरच संपणार आहे. सम्राट चौधरींच्या टीममध्ये कोणत्या नेत्यांना संधी मिळू शकते? जाणून घ्या संभाव्य मंत्र्यांची यादी, राजकीय समीकरणे आणि ताजे अपडेट्स.
Bihar Cabinet Expansion 2026: Who Will Get a Chance in Samrat Chaudhary’s Team?
Bihar Cabinet Expansion 2026: Who Will Get a Chance in Samrat Chaudhary’s Team?Sarkarnama
Published on
Updated on

बिहारच्या राजकारणातील मोठा सस्पेन्स अखेर संपला असून मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर तब्बल 22 दिवसांनी आज पटण्यातील गांधी मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. भाजप, जनता दल युनायटेड आणि मित्रपक्षांमध्ये मंत्रिपदांचे संतुलन साधण्याचा मोठा प्रयत्न या विस्तारातून होणार आहे, अशी चर्चा आहे.

सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळात अनुभवी चेहऱ्यांसोबत काही नवोदितांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. एकूण 31 मंत्री शपथ घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे या विस्तारातील सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला आहे तो म्हणजे माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांची संभाव्य एन्ट्री. जनता दल युनायटेडने त्यांना मंत्रिमंडळात आणण्यासाठी मोठी तयारी केल्याचे मानले जात आहे.

Bihar Cabinet Expansion 2026: Who Will Get a Chance in Samrat Chaudhary’s Team?
West Bengal Election : अमित शाह बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच चक्रे फिरली; भाजपच्या महिला आमदाराला 'दिल्लीतून बोलवलं!

भाजपकडून राम कृपाल यादव, केदार गुप्ता, नीतीश मिश्रा, मिथिलेश तिवारी, रमा निषाद, विजय कुमार सिन्हा, दिलीप जायसवाल, प्रमोद चंद्रवंशी, लखेंद्र पासवान, संजय टायगर आणि इंजिनिअर कुमार शैलेन्द्र यांसारख्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यापैकी काही नेत्यांना मंत्रिपदासाठी फोनदेखील गेल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः इंजिनिअर शैलेन्द्र यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळू शकते.

जनता दल युनायटेडकडून निशांत कुमार, श्रवण कुमार, मदन सहनी, लेसी सिंह, श्वेता गुप्ता, भगवान सिंह कुशवाहा, दामोदर रावत आणि सुनील कुमार यांसारख्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. श्वेता गुप्ता यांना नव्या चेहऱ्यांमध्ये विशेष महत्त्व दिले जात असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाकडून संजय पासवान आणि संजय सिंह यांना पुन्हा संधी मिळू शकते. तसेच जीतनराम मांझी यांच्या पक्षाकडून त्यांचे पुत्र संतोष सुमन मंत्री होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. उपेंद्र कुशवाहा यांच्या गटातून दीपक प्रकाश किंवा स्नेहलता कुशवाहा यांपैकी एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

Bihar Cabinet Expansion 2026: Who Will Get a Chance in Samrat Chaudhary’s Team?
TVK Vijay government : तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता! 30 आमदारांची बंडाची तयारी? अण्णाद्रमुकमध्ये सत्तासंघर्षाचा नवा अंक सुरू?

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि नीतीश कुमार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांसारखे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याने बिहारच्या राजकारणात या विस्ताराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी निवडणुका आणि जातीय-सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन सम्राट चौधरी यांनी संतुलित टीम उभी करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com