Congress: उपाध्यक्षपदासाठी १.५ लाख, सचिवपदासाठी १ लाख अन् १० हजारात पदाधिकारी बना! काँग्रेसनं थेट बोलीच लावली

Congress: समोर भाजपसारखा तगडा राजकीय पक्ष असताना काँग्रेससमोर सध्या अनेक आघाड्यांवर फेरबदलांची गरज ओळखून त्यानुसार पक्षानं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. पण हे सुरु असतानाच काँग्रेसमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Congress: समोर भाजपसारखा तगडा राजकीय पक्ष असताना काँग्रेससमोर सध्या अनेक आघाड्यांवर फेरबदलांची गरज ओळखून त्यानुसार पक्षानं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. पण हे सुरु असतानाच काँग्रेसमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पक्षातील विविध महत्वांच्या पदासाठी थेट बोली लावली जात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं या प्रकाराची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

Congress
Om Raje Nimabalkar: जनता दरबारात पुन्हा निघाला 'तो' विषय; ओमराजे म्हणाले, "आता मी सत्तेत, तुझा डीपी होणार"

बिहारमध्ये हा प्रकार घडला असून इथं काँग्रेसमध्ये सर्वकाही ठिकठाक नसल्याचं यावरुन दिसून आलं आहे. पक्षात सुरु असलेल्या धनशक्तीच्या चर्चांविरोधात इथं पक्षातूनच काही जणांनी बंड पुकारलं आहे. हा प्रकार राहुल गांधी यांच्या विचारांशी विपरित असल्याचं या बंडखोरांचं म्हणणं आहे. त्यामुळं आता काँग्रेसमधील या चर्चेच काँग्रेस काय करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश राम यांनी ११ एप्रिल रोजी 'सृजन साथी जनसंपर्क' अभियान लॉन्च केलं होतं. याचा हेतू असा होता की, राज्यात काँग्रेसला जमिनी स्तरावर मजबूत करणं, यामध्ये एक पारदर्शी आणि मजबूत डिजिटल सिस्टिम बनवणं आणि संगठनात्मकपदांसाठी जमिनीशी जोडलेल्या लोकांना अॅक्टिव्ह करणं आहे.

Congress
कोट्यवधी खर्चूनही पाणी योजना रखडली, भाजपाच्या महापौरांना आलंय टेन्शन! थेट मुख्यमंत्र्यांना घातलं साकडं

राजेश राम यांनी एक पत्र काढलं असून यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट देण्यात आले आहेत. यामध्ये म्हटलं की, जे जितकं टार्गेट गाठेल त्यानुसार त्याला राज्य आणि जिल्हा पातळीवर संघटनात्मकपद दिलं जाईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशा काँग्रेस समर्थकांना घेऊन यायला सांगण्यात आलं आहे जे ५० रुपये फी भरुन 'सृजन साथी' म्हणून नोंदणी करतील. काँग्रेसची मेंबरशीप फी ही केवळ १० रुपये आहे पण त्यापेक्षा 'सृजन साथी' बनण्याची फी अधिक म्हणजे ५० रुपये इतकी आहे. सध्या काँग्रेसचे सदस्य असलेले आणि सदस्य नसलेले लोकही या योजनेंतर्गत ५० रुपये भरून 'सृजन साथी' बनू शकतात. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत बातमी दिली आहे.

Congress
अमेरिका-इराण युद्धात किती भारतायांचा जीव गेला; कोणावर.. कुठे.. झाला हल्ला?

किती लावलीए बोली?

राजेश राम यांच्या पत्रानुसार, जर एखाद्या काँग्रेस कार्यकर्त्यानं ३,००० सृजन साथी म्हणून नोंदणी केली तर त्याला बिहार काँग्रेसचं उपाध्यक्ष बनवलं जाईल. २,००० जणांनी सृजन साथी म्हणून नोंदणी केली तर त्याला बिहार काँग्रेसचं सचिव बनवलं जाईल आणि २०० सृजन साथी जो आणेल त्याला जिल्हा स्तरावर पदाधिकारी बनण्याची संधी मिळणार आहे.

काँग्रेसमध्येच नाराजी

या सृजन साथी योजनेतील खास बाबच अनेक काँग्रेस नेत्यांच्या नाराजीचा भाग बनली आहे. त्याचं म्हणणं आहे की, ही योजना काँग्रेस आणि लोकसभेत विरोधीपक्ष नेते असलेल्या राहुल गांधींच्या विचारधारेच्या विरोधात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि बिहारमधील कटिहार मतदारसंघाचे खासदार तारीक अन्वर यांनी म्हटलं की, "मी काँग्रेसच्या या 'सृजन साथी जनसंपर्क' अभियानाच्या विरोधात आहे. हे सर्वकाही काँग्रेसच्या नियमांचं उल्लंघन करतं. संगठनात्मक पुनर्रचनेच्या नावावर सक्षम नसलेल्या लोकांना प्रोत्साहन दिलं जात आहे. ही मोहिम एकतर्फी पद्धतीनं बिहारमध्ये सुरु करण्यात आली. यासाठी बिहार काँग्रेसच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली गेली नाही"

Congress
Shivsena UBT: शिवसेनेच्या 6 खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मान्यता नाही? पक्षप्रवेश अंगलट येणार? सावंताचा लेटरबॉम्ब

राहुल गांधी, खरगे यांच्यापर्यंत गेला विषय

दरम्यान, बिहार काँग्रेसच्या या अभियानाची माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांच्या कानावर गेली आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ खासदारानं मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर सृजन साथीच्या फीचा मुद्दा उपस्थित केला. यावर खर्गे यांनी आश्चर्यही व्यक्त केलं आहे. तसंच याप्रकरणात आपण लक्ष घालणार असल्याचं खर्गे यांनी सांगितल्याचंही कळतंय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com