Shivsena UBT: शिवसेनेच्या 6 खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मान्यता नाही? पक्षप्रवेश अंगलट येणार? सावंताचा लेटरबॉम्ब

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी पक्षाला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण आता हा प्रवेश त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
Shivsena ubt MP Nagesh Patil
Shivsena ubt MP Nagesh Patilsarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी पक्षाला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण आता हा प्रवेश त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा अध्यक्षांनीही या सहा खासदारांच्या गटाला अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यातच आता खासदार अरविंद सावंत यांनी फुटलेल्या सर्व खासदारांना पत्र लिहून नियमानुसार पक्ष विलिनिकरणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या या लेटरबॉम्बमुळं आता या बंडखोर खासदाराच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Shivsena ubt MP Nagesh Patil
NCP Politics : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या नोटिशीमागे कोणाचा ब्रेन? सच्चिदानंद सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचा प्रयत्न?

अरविंद सावंत यांच्या सहीसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय पक्षाच्यावतीनं १३ जुलै २०२६ रोजी हे पत्र खासदारांना पाठवण्यात आलं आहे. या पत्रात म्हटलं की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं इतर कुठल्याही राजकीय पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नाही, या मथळ्याखाली हे पत्र लिहिलं आहे. यात म्हटलं की, सहा मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मूळ राजकीय पक्ष असून याच्या मशाल या चिन्हावर, लोकांनी दिलेल्या पाठिंब्यावर तुम्ही खासदार म्हणून निवडून आलेले आहात. २०२४ मध्ये पक्षानं तुम्हाला तिकीट दिलं होतं आणि तुम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडं असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात लढला होता. असं असताना आम्हाला सार्वजनिक व्यासपीठांच्या माध्यमातून हे दाखवलं जात असल्याचं समजतंय की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Shivsena ubt MP Nagesh Patil
सुनेत्रा पवारांच्या निवडीला विरोध करणारे सच्चिदानंद सिंह कोण आहेत?

तसंच या संदर्भात तुम्ही लोकसभा अध्यक्षाकडं जाऊन आम्ही शिवसेनेत विलीन झालेलो असल्यानं आमच्या विलिनीकरणाला मान्यता देण्यात यावी. पण आता या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून हे स्पष्ट करण्यात येत आहे की, हा पक्ष मूळ पक्ष असून या पक्षानं एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेत तसंच इतर कुठल्याही राजकीय पक्षात विलिन होण्याची तयारी सुरु केलेली नाही, याला मान्यता दिलेली नाही किंवा पक्षाच्या कुठल्याही सदस्याला यासाठी परवानगी दिलेली नाही. त्यामुळं मूळ राजकीय पक्षाच्या विलिनीकरणाशिवाय संसदीय पक्षाच्या विलिनीकरणाचा प्रश्नच येत नाही, कायद्यातच तशी तरतूद केली आहे. संविधानातील १०व्या अनुसुचितील ४ क्रमांकाच्या परिच्छेदात याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मूळ पक्षाकडून आधीच लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून ही विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या कुठल्याही सदस्य खासदारांना गट म्हणून विलिनीकरणाची मान्यता देऊ नये. यासंदर्भात अध्यक्षांनी दोन्ही बाजुच्या लोकांना सुनावणीसाठी बोलावलं देखील आहे. त्यामुळं लोकसभा अध्यक्षांनी अद्याप गटाच्या विलिनीकरण करण्यासंदर्भात कुठलेही आदेश दिलेले नाहीत.

Shivsena ubt MP Nagesh Patil
US Iran war : ट्रम्प यांनी जगावर टाकला 'हप्ता' बॉम्ब; भारतही हादरला, साऱ्या मेहनतीवर पाणी फिरणार?

म्हणजेच अरविंद सावंत यांच्या पत्रावरुन हे स्पष्ट झालं आहे की, मूळ पक्षाचं इतर कुठल्याही पक्षात विलिनीकरण होणार नाही, तसंच लोकसभा अध्यक्षांनी अद्याप फुटलेल्या शिवसेनेच्या सहा खासदारांच्या गटाला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्यास मान्यता दिलेली नाही. त्यामुळं जर ही मान्यताच मिळाली नसेल तर त्यांचा शिवसेनेतला पक्ष प्रवेश हा अंगलट येण्याची शक्यता आहे. यामुळं या सहाही खासदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com