Nitish Kumar News : नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; चक्रं फिरली, लेकाबाबत काही तासांतच अधिकृत घोषणा

Nishant Kumar political entry : बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून ५ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
CM Nitish Kumar's Son Nishant Kumar to Entry
CM Nitish Kumar's Son Nishant Kumar to Entrysarkarnama
Published on
Updated on

Bihar politics update : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मागील काही वर्षांतील राजकारण नेहमीच अचंबित करणारे राहिले आहे. ते मुख्यमंत्रिपदावर कायम असले तरी त्यांनी सतत मित्रपक्ष बदलले आहेत. मात्र, विकासपुरूष अशी प्रतिमा यांनी कायम ठेवली आहे. इतकी वर्षे बिहारसह देशाच्या राजकारणात सक्रीय असून त्यांनी आपल्या कुटुंबाला त्यापासून दूर ठेवले होते. पण आता ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

नितीश कुमार यांनी राजकारणात कधीच घराणेशाही आणली नाही. या धोरणापासून ते आता दूर जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार यांचा राजकारणातील प्रवेश निश्चित झाला असून, लवकरच संयुक्त जनता दलाकडून (जेडीयू) याची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती राज्याचे मंत्री श्रवणकुमार यांनी मंगळवारी दिली.

निशांत कुमार यांच्यावर पक्षात मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्रवणकुमार म्हणाले की, निशांत कुमार सक्रिय राजकारणात येणार हे आता स्पष्ट झाले आहे. पक्षाचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत होते. होळीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांना कोणती जबाबदारी द्यायची, याचा निर्णय पुढील एक-दोन दिवसांत घेतला जाईल.

CM Nitish Kumar's Son Nishant Kumar to Entry
NCP leadership : राष्ट्रवादीत मोठ्या उलथापालथीचे संकेत; जय पवारांसह पाच नावांभोवतीच फिरणार राजकारण

निशांत कुमार यांना राज्यसभेवर पाठवले जाणार का, या प्रश्नावर मंत्र्यांनी ‘काहीही घडू शकते’ असे सूचक विधान केले. समाजकल्याण मंत्री मदन सहनी आणि ग्रामविकास मंत्री अशोक चौधरी यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. निशांतकुमार हे नितीश कुमार यांचीच प्रतिकृती असून त्यांच्या येण्याने पक्षाला मोठा फायदा होईल, असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला.

भाजपचे नेते आणि उद्योगमंत्री दिलीप जयस्वाल यांनीही निशांतकुमार यांच्या राजकीय प्रवेशाचे स्वागत केले आहे. निशांत कुमार हे उच्चशिक्षित तरुण असून त्यांच्या राजकारणातील प्रवेशासाठी ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून ५ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. सध्याच्या संख्याबळानुसार या पाचही जागा सत्ताधारी ‘एनडीए’ला मिळण्याची शक्यता आहे.

CM Nitish Kumar's Son Nishant Kumar to Entry
Ajit Pawar Plane Crash: जय पवारांनी विमान मालकाचे बिंग फोडले, भुजबळही सरसावले; नेमका ‘तो’ मुद्दा खटकला...

निशांत कुमार यांची राजकारणातील एन्ट्री धडाक्यात करण्याचे नियोजन पक्षाने केल्याचे समजते. त्यांना थेट राज्यसभेत पाठवून थेट दिल्लीच्या राजकारणात सक्रीय करण्याचा पक्षाचा प्लॅन असू शकतो. जेडीयूला राज्यसभेच्या दोन जागा मिळू शकतात. त्यापैकी एका जागेवर निशांत यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बिहारच्या राजकारणात नवे पर्व सुरू होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com