MLC Election : मोठा उलटफेर, विधानपरिषदेत निवडून आलेले दोन आमदार ठरणार अपात्र? सभापतींकडे अधिकृत तक्रार दाखल...

Bihar Vanshidhar Brajwasi, Rahul Raj, BJP Bihar, Independent MLCs : पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपक्ष निवडून आलेल्या सदस्यांना एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करता येत नाही.
Newly elected independent MLCs Vanshidhar Brajwasi and Rahul Raj have joined the BJP shortly after their victory. Jan Suraaj leaders have submitted a complaint to the Bihar Legislative Council Chairman, seeking action under the anti-defection law.
Newly elected independent MLCs Vanshidhar Brajwasi and Rahul Raj have joined the BJP shortly after their victory. Jan Suraaj leaders have submitted a complaint to the Bihar Legislative Council Chairman, seeking action under the anti-defection law.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Independent MLCs news : बिहारमधील विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आठ जागांवर झालेल्या निवडणुकीनंतर दोन आमदारांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या या दोन आमदारांनी निकालानंतर ४८ तासांच्या आतच भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांची ही कृती आता अपात्रतेच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे.

नवनिर्वाचित अपक्ष MLC वंशीधर बृजवासी आणि राहुल राज यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी अधिकृतपणे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले आहे. त्याचे फोटो, व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्याविरोधात आता सत्ताधारी जेडीयूसह आरजेडी आणि जनसुराज पक्ष आक्रमक झाले आहे.

जनसुराज पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवारी बिहार विधान परिषदेच्या सभापतींची भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत माहिती देताना बिहार विधान परिषदेचे माजी सदस्य आणि जनसुराजचे नेते रामबली चंद्रवंशी यांनी सांगितले की, निकालानंतर दोन्ही अपक्ष सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सदस्यत्वाची पावती घेत त्यांनी पक्षाचे औपचारिक सदस्यत्वही स्वीकारले आहे.

Newly elected independent MLCs Vanshidhar Brajwasi and Rahul Raj have joined the BJP shortly after their victory. Jan Suraaj leaders have submitted a complaint to the Bihar Legislative Council Chairman, seeking action under the anti-defection law.
केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीच्या नावे स्वित्झर्लंडमध्ये 34 कोटींचे अपार्टमेंट; पाच वर्षांत संपत्तीत किती वाढ?

पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपक्ष निवडून आलेल्या सदस्यांना एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करता येत नाही. त्याबाबतच्या तरतुदी कायद्यात आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारांची कृती घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केल्याचे चंद्रवंशी यांनी सांगितले. दरम्यान, सभापतींनी कायद्यानुसार योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचेही ते म्हणाले.

Newly elected independent MLCs Vanshidhar Brajwasi and Rahul Raj have joined the BJP shortly after their victory. Jan Suraaj leaders have submitted a complaint to the Bihar Legislative Council Chairman, seeking action under the anti-defection law.
Sting Operation news : केंद्रीय मंत्र्यांच्या घरात शिजला स्टिंग ऑपरेशनचा प्लॅन? पोलिसांनी उडवून दिली खळबळ

वंशीधर बृजवासी और राहुल राज यांच्या भाजप प्रवेशामुळे पुन्हा एकदा पक्षांतरबंदी कायद्यावरून देशात चर्चेला उधाण आले आहे. त्याचप्रमाणे बिहारमध्ये एनडीएमध्येही वादाची ठिणगी पडली आहे. दोन्ही आमदारांनी जेडीयू म्हणजेच एनडीएच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव केला आहे. त्यानंतर भाजपने या आमदारांना पक्षात प्रवेश दिल्याने जेडीयूने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत जेडीयूचे नेतेही आता बोलू लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.