BJP news : माजी मुख्यमंत्री भाजपला रामराम ठोकणार? मातब्बर नेत्याचे नाव घेत काँग्रेसने वाढविले टेन्शन

Captain Amarinder Singh, Congress Punjab politics, : अमरिंदर यांनी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीवरही उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या घरवापसीच्या चर्चांना उधाण आले आहे.
BJP vs Congress (AI Image)
BJP vs Congress (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई हे पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता पंजाबमधून भाजपला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका बसू शकतो.

मागील विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा पंजाबमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व मातब्बर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या घरवापसीसाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सुरूवातीला स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी हा पक्ष भाजपमध्ये विलीन केला. पण तिथेही त्यांना अपक्ष यश मिळाले नाही. आपच्या त्सुनामीपुढे त्यांनाही पराभवचा धक्का सहन करावा लागला होता. ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्यास पक्षाची ताकद वाढून सत्ताधारी आम आदमी पक्षासमोर आव्हान उभे करू शकतात.

BJP vs Congress (AI Image)
MLA verdict : कोर्टाचा अभूतपूर्व निकाल, 10 वर्षांनंतर आमदारकी रद्द; पराभूत उमेदवाराला केलं विजयी घोषित

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या एका विधानामुळे पंजाबमधील राजकीय हालचाली समोर आल्या आहे. अमरिंदर सिंग हे काँग्रेसच्या संपर्कात आहेत. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांचा पक्षाशी जुना संबंध असून आजही तो कायम आहे, असे सांगत हुड्डा यांनी खळबळ उडवून दिली आहे.

BJP vs Congress (AI Image)
Congress news : दक्षिणेत काँग्रेसमध्ये फूट; शिवकुमारांच्या शपथविधीला दांडी, बड्या नेत्याने वादग्रस्त मुद्यालाच घातला हात

अमरिंदर यांनी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीवरही उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या घरवापसीच्या चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहण समारंभालाही ते गैरहजर होते. मागील काही महिन्यांत कॅप्टर अमरिंदर यांचा काँग्रेसच्या नेतृत्वाविषयीची भूमिका काहीशी मवाळ झाल्याचेही दिसून आले आहे. आपल्या भावाचे निधन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्याला फोन केल्याचे सांगत अमरिंदर यांनी त्यांच्यासोबत असलेली भावनिक नात्याविषयी सूचक संकेत दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com