पाटणा : भाजपच्या नेत्याने माजी मुख्यमंत्र्यांची जीभ कापणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. हे माजी मुख्यमंत्री दुसरेतिसरे कुणी नसून, भाजपचेच सहकारी जितनराम मांझी (Jitan Ram Manjhi) हे आहेत. बिहारमध्ये (Bihar) संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपचे (BJP) सरकार आहे. यात मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) हा पक्षही सहभागी आहे. भाजपच्या नेत्याने सहकारी पक्षाच्या नेत्यालाच धमकी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मांझी यांनी हिंदू धर्म आणि ब्राह्मणांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ उडाला आहे. एखादा ब्राह्मणाने जितनराम मांझी यांची जीभ कापून मला आणून दिल्यास त्याला 11 लाख रुपये बक्षीस मिळेल. खरेतर मांझींची किंमत 11 पैशांचीही नाही, अशी घोषणा भाजप नेते गजेंद्र झा यांनी केली आहे. भाजप नेत्याने सरकारमधील घटक पक्षाच्या नेत्यालाच धमकी दिली आहे. या वादामुळे सरकारमधील घटक पक्षांमध्ये जुंपल्याचे चित्र दिसू लागले आहे.
मांझी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्यांनी हिंदू धर्माच्या प्रथा पाळू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, त्यांना ब्राह्णणांबद्दल अपशब्द वापरले आहेत. दलित ग्राहकांकडून हे ब्राह्मण दक्षिणा घेतात परंतु, त्यांच्याकडून अन्न स्वीकारत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. यावरून मोठा गदारोळ सुरू झाला आहे. ब्राह्मण संघटना आणि भाजपच्या नेत्यांकडून मांझींचा निषेध करण्यात येत आहे. अनेक ब्राह्मण संघटनांनी मांझी यांचा पुतळा जाळला आहे.
मागील काही काळापासून भाजपचे नेते नितीशकुमार यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. याला जेडीयूचे नेतेही उत्तर देऊ लागल्याने सत्ताधारी आघाडीत जुंपल्याचे चित्र अनेक वेळा दिसू लागले आहेत. त्यातच आता मांझींची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी नितीशकुमार यांनी भाजपच्या महिला आमदाराबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. याची तक्रार महिला आमदार निक्की हेमब्रम यांनी थेट पक्ष नेतृत्वाकडे केली होती. यामुळे दोन्ही पक्षांतील बेबनाव समोर आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.