BJP leader : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का! ३ वेळा आमदार राहिलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा; बालेकिल्ला धोक्यात!

political resignations News : राज्यातील निवडणुकाजवळ आल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या तोंडावरच राजीनामा देऊन इतर पक्षात प्रवेश केला जात आहे.
Bjp flag
BJP flagSarkarnama
Published on
Updated on

Political News : राज्यातील निवडणुकाजवळ आल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या तोंडावरच राजीनामा देऊन इतर पक्षात प्रवेश केला जात आहे. चार दिवसापूर्वीच एका घोटाळ्यामध्ये आरोपी असलेल्या माजी खासदाराना भाजपमध्ये प्रवेश देण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, त्याची भाजप हायकमांडकडून दाखल घेतली गेली नाही त्यामुळे नाराज असलेल्या भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जीवन प्रदीप दैश यांनी पत्रकार परिषद घेत शनिवारी तडकाफडकी राजीनामा देण्याची घोषणा केली.

दोन दिवसांपूर्वी एका घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले माजी खासदार रवींद्र कुमार यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने त्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, याकडे भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आले. जीवन प्रदीप दैश यांनी शुक्रवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी पक्षावर नैतिकता ढासळल्याचा आरोप केला आहे.

Bjp flag
ZP Election : संभाजीनगरमध्ये पडद्यामागे वेगवान हालचाली : शिवसेना भाजपचा गेम करण्याच्या तयारीत? महापालिकेचे उट्टे जिल्हा परिषदेत निघणार

ओडिसामध्ये 2024 मध्ये सत्तेत आलेल्या भाजपमध्ये (BJP) नैतिकता शिल्लक राहिली नाही. CBI च्या चौकशी फेऱ्यात अडकलेले आणि जामिनावर जेलमधून बाहेर आलेल्या माजी खासदाराला भाजप जर पक्षात प्रवेश देत असेल तर पक्ष आपल्या नीती आणि मूल्यांपासून खूप लांब गेला आहे आणि यामुळे भाजपला मोठा परिणाम भोगावा लागणार आहे असा जोरदार हल्लाबोल यावेळी दैश यांनी केला.

Bjp flag
Bhimashankar Temple News : मराठी माणसाला शिव्या घालणाऱ्या भाजप खासदाराला पुण्यात VIP ट्रिटमेंट : प्रशासनाविरुद्ध रोष; जिल्हाधिकाऱ्यांचे कानावर हात

त्यासोबतच यावेळी त्यांनी राज्य नेतृत्वावर निशाणा साधत म्हणाले, चिट फंड घोटाळ्याचा आरोपीला पक्षात प्रवेश देऊन आता भाजपमध्ये नीतीमत्ता शिल्लक राहिली नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

Bjp flag
BJP MLA : टोकाचा संघर्ष झालेल्या भाजपच्या दोन आमदारांमध्ये अखेर सत्तेचा तह; सभापतिपदासाठी अडीच वर्षांचा फार्म्युला

भारतीय वायु सेनेचे माजी सैनिक जीवन दैश हे पहिल्यांदा 2000 मध्ये भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी BJD मध्ये प्रवेश केला. ते 2009 आणि 2014 मध्ये देखील निवडून आले. मात्र 2020 मध्ये त्यांना काही कारणास्तव पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. त्यावेळी त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.

Bjp flag
Patan Politic's : देसाई गटाचा विजयी वारू अखेर पाटणकरांनी रोखला; राजकीयदृष्ट्या संवेदनशील संस्थेत दणदणीत विजय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com