
Jaipur, 10 August : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि दिवंगत राज्यपाल सत्यपाल मलिक यांना भारतीय जनता पक्षाने दिलेल्या वागणुकीच्या विरोधात बोलणे पक्षाच्या प्रवक्त्याला चांगलेच महागात पडले आहे. धनखड आणि मलिक यांची बाजू घेत भाजप नेतृत्वावर टीका केल्यामुळे राजस्थानमधील पक्षाचे प्रवक्ते कृष्ण कुमार जानू यांची भाजपतून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुलवामा हल्ल्यावरून केंद्र सरकारवर विशेषतः मोदी आणि शाह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांनी केलेल्या शेवटच्या व्हिडिओमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुलवामा हल्ल्यावरून मोदींवर निशाणा साधला होता.
कृष्ण कुमार जानू म्हणाले, सत्यपाल मलिक हे चार राज्यांचे राज्यपाल आणि भाजपचे (BJP) राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्कराच्या वेळी पक्ष ज्या पद्धतीने सत्यपाल मलिक यांच्यासोबत वागला त्यावरून मन एकदम दुःखी झाले. ते पाहून भाजपमध्ये काम करणाऱ्या जाट नेत्यांना प्रश्न विचारण्याची इच्छा निर्माण झाली. जे मंत्री, पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांना एका प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल. जे सत्पाल मलिक यांच्यासोबत झाले आहे, ते तुमच्यासोबत होणार नाही, हे कशावरून? ज्या पद्धतीने मलिकांचा तिरस्कार करण्यात आला आहे, ते योग्य नाही.
भाजपचे आजचे नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, यशवंत सिन्हा, प्रवीण तोगडिया, वसुंधराराजे, शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत ज्या पद्धतीने वागले आहेत. राज्य पातळीवरील नेत्यांना कठपुतळी बनविण्याचे काम आजचे भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व करीत आहे. पक्ष चुकीच्या दिशेने जात आहे. भाजपमधील जाट नेते गप्प का आहेत, असा प्रश्न मला पडला आहे, असा सवालही कृष्ण कुमार जानू यांनी आजच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला विचारला आहे.
जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोप जानू यांनी केला आहे. ते म्हणाले, उपराष्ट्रपती धनखड यांचे राज्यसभेत निरोपाचे भाषण झाले नाही. तसेच, त्यांची फेअरवेल पार्टी झाली नाही. हा सरकारचा अहंकार नाही तर काय आहे. सरकारच्या अहंकाराला आव्हान देणे जाट समाजाला नवीन नाही. जो जाट आपल्या संस्कारापासून दूर गेला, तो कसला जाट? हे सर्व पाहूनही जे जाट बांधव भाजपमध्ये काम करीत आहेत. त्यांचा धिक्कार आहे. त्यांना पार्टीचे चमचे म्हटले जाईल.
जाट बांधवांना मी त्यांना पुन्हा एकदा आवाहन करेन की, चुकीच्या विरोधात बोलण्याची जाट समुदायाची परंपरा खंडीत केली जाऊ नये. भाजपकडून धनखड आणि मलिक यांना पद आणि प्रतिष्ठा मिळाली होती. मात्र, शेवटच्या वेळी सरकार आणि पार्टी त्यांच्यासोबत ज्या पद्धतीने वागली, ती त्यांच्या अतिरिक्त चापलुसीचाच परिणाम होता, असेही जानू यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कृष्ण कुमार जानू यांनी पक्षनेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जाहीरपणे टीका केल्याने त्यांच्यावर भाजपकडून कारवाई करण्यात आली आहे. जानू यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच, पक्षनेतृत्वावर टीका करणे आणि पक्षाची शिस्त मोडणे खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पक्षाकडून याद्वारे देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.