

New dehli News : भाजपने आगामी काळात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल केले आहेत. पुढील वर्षी होत असलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याठिकाणच्या प्रभारी पदाची जबाबदारी महाराष्ट्रातील बड्या नेत्यावर सोपवली आहे. त्यासोबतच इतर राज्यातील नव्या प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडाची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपने आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही संघटनात्मक बदल केले आहेत. येतंय काळात निवडणूक होत असलेल्या राज्यात त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. लवकरच उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुका होत असल्याने त्याठिकाणच्या प्रभारी पदाची जबाबदारी महाराष्ट्रातील माजी मंत्री व खासदार विनोद तावडे यांच्याकडे सोपवली आहे.
महाराष्ट्राच्या प्रभारीपदी बैजयंत जय पांडा यांच्या नियुक्ती झाली असून अमित मालवीय, सदानंद तनावाडे आणि कमलजीत सहरावत हे सहप्रभारी आहेत. दरम्यान सुनील बन्सल यांना यांच्याकडे पश्चिम बंगाल आणि तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय राम माधव हे उत्तराखंडचे नवे प्रभारी असतील, तर बांसुरी स्वराज यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे छत्तीसगड व हरियाणा या दोन राज्याची जबाबदारी असणार आहे.
विनय सहस्त्रबुद्धे हे दिल्ली भाजपचे प्रभारी असणार आहेत. त्यासोबतच हरीश द्विवेधी हे कर्नाटक राज्याचे प्रभारी असणार आहेत. रंदेश्वरी यांची ओडिशासाठी भाजप प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाने बिप्लव देव यांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनवलं आहे, तर भारती पवार गोवा, सतीश पुनिया यांना पंजाब आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारी म्हणून नियुक्त केलं. या व्यतिरिक्त अनिल बलूनी यांना भाजपा कम्युनिकेशन सेलचे को-ऑर्डिनेटर आणि आशीष अग्रवाल यांची संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या 6 नेत्यांकडे दोन राज्याची जबाबदारी
स्मृती इराणी : छत्तीसगड आणि हरियाणाच्या प्रभारी, हरीश द्विवेदी : बिहार आणि कर्नाटकचे प्रभारी, डॉ. सतीश पूनिया : जम्मू-काश्मीर आणि पंजाबचे प्रभारी, राम माधव : तामिळनाडू आणि उत्तराखंडचे प्रभारी, सुनील बन्सल : तेलंगणा आणि पश्चिम बंगालचे प्रभारी, अनिल अँटोनी : नागालँडचे प्रभारी आणि गोव्याचे सहप्रभारी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.