BJP Political News: लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आता संघटनात्मक वाढीकडे लक्ष दिले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 मध्ये संपला आहे. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जेपी नड्डा यांच्याकडे केंद्रीय मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री पदाची नवीन जबाबदारी सोपवली आहे.
त्यांच्याकडे आता आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. भाजपचे अध्यक्ष अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपला असल्याने जानेवारी 2025 पूर्वी भाजपच्या नव्या अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लवकरच भाजपकडून कार्याध्यक्ष नेमण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात नवा कार्याध्यक्ष नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नड्डा (JP Nadda) यांचा कार्यकाळ जून 2024 मध्ये संपला आहे. परंतु, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन पक्षप्रमुखाची निवड होईपर्यंत ते या पदावर कायम राहतील असा ठराव मंजूर करण्यात आला होता.
लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर येत्या काळात अनेक राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच पक्षाची जबाबदारी सांभाळण्यासाठी पक्षाला पूर्ण मुदतीचा पक्षाध्यक्ष हवा आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.. त्यामुळे या सहा महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत चर्चा सुरु राहणार आहे.
नुकतीच भाजपच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये पुढील कार्याध्यक्षांच्या नावाची चर्चा करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्व राज्यांच्या सरचिटणीसांची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कामगिरीवर चर्चा केली जात आहे.
दुसरीकडे भाजपच्या (Bjp) याच बैठकीत कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कार्यकारी अध्यक्ष आणि त्यानंतर पूर्णवेळ अध्यक्ष होण्याच्या या प्रक्रियेदरम्यान नड्डा सल्लागाराच्या भूमिकेत असणार आहेत. त्यामुळे लवकरच कार्याध्यक्ष पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.