देशाला स्वातंत्र्य ९९ वर्षांसाठी भाडेतत्वावर मिळाले; भाजप प्रवक्त्याचा दावा

याला काँग्रेस जबाबदार आहे.
Ruchi Pathak
Ruchi Pathaksarkarnama
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर मिळाले, असा अजब दावा करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे या तरुणीला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. ही तरुणी भाजप (BJP) युवा मोर्चाची प्रवक्ता आहे. त्यामुळे तिने केलेले हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

Ruchi Pathak
होय, निकाहनामा खराच! क्रांती रेडकरचा मलिकांवर पलटवार

एका मुलाखतीत भाजप युवा मोर्चाची प्रवक्ता रुची पाठक (Ruchi Pathak) सहभागी झाली होती. काँग्रेसबद्दल बोलत असताना तिने हे विधान केले. काँग्रेसला पूर्ण स्वातंत्र्यही मिळवता आले नाही. ९९ वर्षांसाठी हे स्वातंत्र्य त्यांनी घेतलेले असल्याचे रुची म्हणाली. ती म्हणाली, भारत संपूर्णपणे स्वतंत्र झालेला नाही. हे स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वार मिळालेले. ब्रिटीश क्राऊनने भारताला ९९ वर्षांच्या भाडेकराराने स्वातंत्र्य दिले. आणि याला काँग्रेस जबाबदार आहे. इतिहासाची पाने तुम्ही चाळून पाहा. स्वातंत्र्य आंदोलन चालू होते आणि पंडित नेहरु व महात्मा गांधी नेतृत्व करत होते. त्या वेळी ब्रिटीशांना भारताला स्वातंत्र्य द्यायचे नव्हते. त्यावेळी निवडणुका नसल्याने नेहरु आणि गांधीजी यांनी ब्रिटीश क्राऊनची शपथ घेतली होती. त्यामुळे आज मिळालेले स्वातंत्र्य हे ९९ वर्षांच्या भाडेकरारावर आहे. मी याचे पुरावेही तुम्हाला देऊ शकते, असा दावाही रुची पाठक हीने केला आहे.

Ruchi Pathak
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नवीन पक्ष अन् दुसऱ्याच दिवशी शहांच्या भेटीचा योग

तिने केलेल्या या दाव्याविषयी कार्यक्रमाच्या निवेदकानेही तिला विचारले की, जर ही एवढी मोठी गोष्ट आहे तर भाजपचे नेते आणि इतर कोणत्याही पक्षाचे नेते याबद्दल कसलाच उल्लेख करत नाहीत? त्यावर आपण पुरावे सादर करु शकतो, असेच ती म्हणत होती. तिचे हे विधान आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अनेक मीम्सचा विषयही ठरत आहे. अनेकांनी तिला व्हॉटसप विद्यापीठाची विद्यार्थिनीही असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.