

Manipur News: मणिपूरमधील हिंसाचार दिवसेंदिवस वाढत असतानाही केंद्र सरकार गेल्या दोन- अडीच महिन्यांपासून शांत का आहे. यामागे भाजपच्या हिंदू-मुस्लीम राजकारणाकडे खासदार संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
मणिपूरमध्ये कश्मीर पेक्षा भयंकर परिस्थिती आहे. पण तिथे सुरु असलेल्या हिंसाचारात भाजपला हिंदू- मुसलमान राजकारण करता येत नसल्याने भाजप तिथे शांत आहे. अशी जहरी टीका शिवसेनेचे राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. मणिपूर हिंसाचारावरुन संजय राऊत यांनी पून्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
"मणिपूरमध्ये जो हिंसाचार सुरू आहे त्यात जर एखादा अल्पसंख्यांक किंवा मुसलमान असता तर भाजपने आतापर्यंत या देशात गोंधळ घातला असता, पण मणिपूरमध्ये भाजपला कोणताही राजकीय फायदा होत नसल्याने ते शांत आहेत. आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे की, या प्रकरणावर मोदी काहीही बोलायला तयार नाहीत.
मणिपूर हिंसाचारावर केंद्र सरकार काही भूमिका घेत नाही, की तिथले राज्यपाल काही बोलत नाहीत, की तिथले प्रशासन. विशेष म्हणजे आपल्या देशाच्या राष्ट्रपती या देखील एक महिलाच आहेत. देशात महिला राष्ट्रपती असतानाही मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जाते. राष्ट्रपतींही यावर काही भूमिका मांडत नाहीत. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी मणिपूर हिंसाचारासंदर्भात आदेश दिले, ते अस्वस्थ झाले, पण देशाच्या महिला राष्ट्रपतींकडून अद्यापही या घटनेवर कोणतीही बाजू मांडण्यात आलेली नाही, याकडेही राऊतांनी लक्ष वेधलं.
मणिपूरची परिस्थिती कश्मीर सारखीच भयंकर झाली आहे. पण भाजपला मणिपूरमध्ये हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान असं राजकारण करता येत नाही. तिथे कश्मीर फाईल्स सारख्या कथा रंगवता येतात. मणिपूरमध्ये ज्या दोन महिलांची नग्न धिंड काढली, त्यातील एका महिलेचा पती लष्करात अधिकारी होता. त्यांनी देशासाठी कारगिलचं युद्ध लढलं, शांती सैनिक म्हणून अनेक देशातही ते गेले आहेत. असं असतानाही आता तरी पंतप्रधानांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. पण हे सरकार मणिपूरमधील हिंसाचार आणि महिलांवर सुरू असलेले अत्याचार निर्लज्जाप्रमाणे पाहत आहे, अशी जहरी टीकाही राऊत यांनी केली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.