Bollywood actor Support CJP : 'रँचो'नंतर आता बड्या अभिनेत्याचाही मोदी सरकारविरोधात एल्गार; कॉक्रोच जनता पार्टीची जबरदस्त क्रेझ

Cockroach Janata Party social media trend : रँचोनंतर आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
Prakash Raj
Prakash RajSarkarnama
Published on
Updated on

देशभरात परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, पेपरफुटी आणि विविध गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी वाढत आहे. अनेक स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये झालेल्या कथित गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी 6 जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

या आंदोलनाला आता अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. अभिनेता प्रकाश राज यांनीही या आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 6 जून रोजी दिल्लीत उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सध्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे ते व्यस्त असले तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत एकजूट दाखवण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

Prakash Raj
Top 10 News : 'NCP'च्या बडा नेत्याने घेतली शरद पवारांची भेट ते टीसीएस प्रकरणाला नवे वळण अन् तुकाराम मुंढेंचा धडाका ते भाजपची 'गेमचेंजर' खेळी

प्रकाश राज यांनी देशातील तरुणांना देखील या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार याविरोधात आवाज उठवण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी म्हटले. सोशल अॅक्टिव्हिस्ट सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून ते देखील सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आंदोलनाची माहिती दिली होती. त्यांनी विद्यार्थी, पालक आणि समर्थकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. 6 जून रोजी ते अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Prakash Raj
Nashik TCS Case : मतीन पटेलने पोलीस तपासाला दिले धक्कादायक नवे वळण, निदा खान आणि इम्तियाज जलील संबंधच नाही!

गेल्या काही महिन्यांत विविध परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि अनियमिततेच्या घटना समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. यामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आंदोलनाकडे देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. प्रकाश राज यांच्यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्याने दिलेल्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाची अधिक चर्चा सुरू झाली असून सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com