Nepal Catastrophe: तिबेट-नेपाळमध्ये महाप्रलय! भारतालाही धोका, १०५ भारतीय नागरिक बेपत्ता; नेपाळच्या टुरिझम बोर्डाची माहिती

Nepal Catastrophe: नेपाळमधील भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळं हाहाकार उडाला असून या पुराच्या मार्गातील पुलासह इमारतींसह सर्वकाही वाहून गेलं आहे. याचे भीषण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Nepal Flash Floods News: 105 Indian Tourists Missing
Nepal massive flood 105 Indians MissingSarkarnama
Published on
Updated on

Nepal Flood Latest News : नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या बातम्यांमध्ये आता धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे यामध्ये १०५ भारतीय नागरिक बेपत्ता झाले आहेत. नेपाळच्या टुरिझम बोर्डानं ही माहिती दिली आहे. कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरुंचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्षात एकूण ४०० हून अधिक लोक या प्रलयात बेपत्ता झाले आहेत. नेपाळमध्ये बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता अचानक भोटेकोशी नदीला महापूर आल्याचं नेपाळ पर्यटन बोर्डानं सांगितलं आहे.

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला पूर आला असून यामध्ये ३८४ लोक बेपत्ता झाले आहेत. या लोकांमध्ये १०५ भारतीयांचा समावेश आहे. नेपाळच्या टुरिझम बोर्डानं या बेपत्ता लोकांची प्राथमिक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये २९१ विदेशी नागरीक आणि ९३ स्थानिक नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. या परिस्थितीशी दोन हात करताना बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. यासाठी टुरिझम बोर्ड, पर्यटन पोलीस, आणि पर्यटन विभागाशी संबंधित अन्य ट्रॅव्हल एजन्सिज, गाईड्स, स्थानिक अधिकारी आणि सुरक्षा एजन्सीज मिळून बचाव कार्य करत आहेत. तसंच पर्यटकांशी भेटून त्यांचा ठाव-ठिकाणा आणि त्यांच्या स्थितीची पुष्टी केली जात आहे.

Nepal Flash Floods News: 105 Indian Tourists Missing
Pune MIDC: ​पुण्यात आणखी एक महाकाय MIDC! चाकण-रांजणगाव नको, 'या' भागात उभं राहणार ७४३ हेक्टरचं नवं इंडस्ट्रियल हब

नेपाळच्या टुरिझम बोर्डानं सांगितलं की, हा डेटा १० टुरिझम आणि ट्रॅव्हल एजन्सीजद्वारे देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे बनवण्यात आला आहे. लिस्टनुसार, बेपत्ता लोकांमध्ये १०५ भारतीयांशिवाय ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, अमेरिका, मलेशिया, युके आणि दक्षिण अफ्रिका इथल्या नागरिकांचा समावेश आहे. यांपैकी ३७ लोक हे एनआरआय (अनिवासीय भारतीय) असल्याचंही समोर आलं आहे.

कुठल्या ट्रॅव्हल कंपन्यांचे होते भारतीय प्रवासी?

नेपाळ पर्यटन बोर्डाच्या माहितीनुसार, सम्राट टुर्स अँड ट्रॅव्हल्स या पर्यटन कंपनीचे ५९ भारतीय नागरिक बेपत्ता झाले आहेत. तसंच लीफ हॉलिडे या पर्यटन कंपनीचे ४६ भारतीय पर्यटक या भीषण महाप्रलयामध्ये बेपत्ता झाले आहेत.

आपातकालीन संपर्कासाठी क्रमांक

दरम्यान, या आपत्कालिन परिस्थितीत संपर्कासाठी नागरिकांना 1234 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन तसंच हॉटलाईन क्रमांक ११४४, पर्यटन पोलिस - ९८५१२८९४४५ या क्रमांकांवर संपर्क करण्याचं आवाहन नेपाळ पर्यटन बोर्डानं केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com