Manipur Violence: मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा तपास 'सीबीआय'कडे; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

Central Govt : मणिपूरच्या घटनेवरून केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर
SBI News
SBI NewsSarkarnama
Published on
Updated on

Manipur News: मणिपूरात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवरून संपूर्ण देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयने घेत सरकारला कारवाईचा इशारा दिला होता.

यानंतर केंद्र आणि मणिपूर सरकारने याची तातडीने गंभीर दखल घेत आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवत आरोपींना अटक केली. यानंतर आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला असून सीबीआय या प्रकरणाची कसून चौकशी करणार आहे.

SBI News
Manipur Violence: मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल; महिन्याभरात मागवला अहवाल

मणिपूरमधील महिलांचा व्हायरल व्हिडिओ ज्या व्यक्तीने काढला होता, त्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. तर केंद्र सरकारने कुकी आणि मैतेई समुदायाच्या काही सदस्यांशी चर्चा केल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सध्या मणिपूरमधील परिस्थिती काहीसी सुधारली असून येथील परिस्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेऊन आहे.

SBI News
Manipur Violence: मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेत पाच जणांना बेड्या; तपास सुरूच

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही मणिपूर सरकारला या घटनेचा अहवाल महिन्याभरात सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. पंतप्रधान मोदींनीही आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे अश्वासन दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणावर तातडीने पावलं उचलण्याचे निर्देश दिले होते. यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com