Chandigarh Mayoral Polls : सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा धसका? भाजपचे महापौर सोनकर राजीनामा देण्याची शक्यता

Supreme Court : सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार असून त्यामध्ये चंदीगड महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh News : चंदीगड महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले असून सोमवारी सुनावणी आहे. त्याआधी भाजपचे महापौर मनोज सोनकर राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. (Chandigarh Mayoral Polls)

चंदीगड महापौरपदासाठी 30 जानेवारीला झालेल्या निवडणुकीत सोनकर यांचा विजय झाला होता. मात्र, या निवडणुकीत आप (AAP) आणि काँग्रेस आघाडीच्या आठ नगरसेवकांचे मतदान अवैध ठरवण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपत्रिकेत खाडाखोड केल्याचा आरोप आघाडीकडून करण्यात आला. तसेच त्याचे व्हिडिओही व्हायरल करण्यात आले.

BJP
NCP MLA Disqualification Case : अजित पवारांना नागालँडमध्येही मोठा दिलासा; शरद पवारांना तिथेही धक्का...

निवडणुकीत झालेल्या गोंधळानंतर नगरसेवक कुलदीप कुमार यांनी निवडणूक प्रक्रिया पुन्हा घेण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे. त्यावर काही दिवसांपुर्वीच झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरन्यायाधीश म्हणाले होते की, निवडणूक अधिकारी अशाप्रकारे निवडणूक कशी घेऊ शकतात? अशी अधिकाऱ्यांची वागणूक असते? ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीची हत्या आहे. हे पाहून आम्ही हैराण झालो. या व्यक्तीवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी नाराजी चंद्रचूड यांनी व्यक्त केली होती. तसेच पुढील सुनावणीपर्यंत चंदीगड महापालिकेची बैठक घेण्यासही न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सोनकर त्याआधीच राजीनाम देऊ शकतात.

दरम्यान, निवडणुकीमध्ये आघाडीकडे 20 मते होती. या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार, हे निश्चित मानले जात होते. आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी मतदानही केले. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यापैकी आठ मते अवैध ठरवली. त्यामुळे आघाडीला केवळ बारा मते मिळाली. परिणामी भाजपचा उमेदवार 16 मते मिळाल्याने विजयी घोषित करण्यात आला.

आपचे तीन नगरसेवक संपर्कात?

आपचे तीन नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सुप्रीम कोर्टाने पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यास भाजपचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी नेत्यांनी कंबर असल्याचे सांगितले जात आहे. आघाडीत बिघाडी करून नगरसेवकांना गळ टाकण्यात येत असल्याचे चर्चा आहे.

BJP
Kamal Nath News : कमलनाथ काँग्रेसच्याच अंगणात? 'हात' सोडणार नाही; भेटीनंतर पक्षनेत्याचा दावा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com