मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रथमच आले महाराष्ट्र सदनात!

Former President Mrs. Pratibha Patil : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील दिल्लीत आल्या आहेत.
CM Yogi Adityath & Former President Mrs. Pratibha Patil Latest News
CM Yogi Adityath & Former President Mrs. Pratibha Patil Latest News Sarkarnama

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आज (ता.25 जुलै) देशाच्या पहिल्या राष्ट्रपतीपदाचा मान मिळविलेल्या प्रतिभाताई पाटील (Former President Pratibha Patil) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी श्री गणेशाची प्रतिमा माजी राष्ट्रपती श्रीमती पाटील यांना भेट दिली. (CM Yogi Adityath & Former President Mrs. Pratibha Patil Latest News)

CM Yogi Adityath & Former President Mrs. Pratibha Patil Latest News
Droupadi murmu : राष्ट्रपती भावुक, म्हणाल्या, "मी कॉलेजला जाणारी माझ्या गावातील पहिली मुलगी.."

यानिमित्ताने योगी आदित्यनाथ बहुधा प्रथमच महाराष्ट्र सदनात आले. कोपर्निकस मार्गावरील जुन्या महाराष्ट्र सदनात योगी आदित्यनाथ यांनी माजी राष्ट्रपती श्रीमती पाटील यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi murmu) यांच्या शपथविधी सोहळ्यास हजर रहाण्यासाठी प्रतिभाताई पाटील दिल्लीत आल्या आहेत. श्रीमती पाटील यांच्यानंतरच्या मुर्मू या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

CM Yogi Adityath & Former President Mrs. Pratibha Patil Latest News
President Of India : 25 जुलै लाच राष्ट्रपतींचा शपथविधी का होतो? हे आहे कारण

दरम्यान, आज भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा (N.V.Ramana) यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत मुर्मू यांनी 64 टक्के मते मिळवत विजयी झाल्या होत्या. मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या.या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी यावेळी उपस्थिती लावली. यावेळी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषदचे सदस्य, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी या समारंभाला उपस्थित होते. याचबरोबर माजी राष्ट्रपती श्रीमती पाटील या देखील उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com