

Congress BJP political news : राहुल गांधी यांचे भक्कम शिलेदार, काँग्रेसमधील संकटमोचन कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे काँग्रेस अन् भाजपमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
परंतु, डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकमधील विकासकामांसाठी केंद्र सरकारच्या सहकार्याच्या मागणीसाठी ही भेट होती, असे स्पष्ट केलं. राज्यातील पायाभूत सुविधा, गुंतवणूक, सिंचन, शहरी विकास आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सविस्तर चर्चा केल्याचे समजते.
मुख्यमंत्री शिवकुमार (DK Shivakumar) यांनी समाज माध्यमांवर या भेटीची माहिती दिली. कर्नाटकच्या विकासात्मक प्राधान्य क्रमांवर पंतप्रधानांशी सकारात्मक आणि विधायक चर्चा झाली. राज्यातील पायाभूत सुविधा उभारणी, गुंतवणूक आकर्षित करणे, नवोन्मेषाला चालना देणे आणि नागरिकांच्या जीवनमानावर थेट परिणाम करणाऱ्या विविध उपक्रमांबाबत केंद्राच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कर्नाटकने देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीत नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, ही भूमिका आणखी मजबूत करण्याचा राज्य सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहकारी संघराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून केंद्र सरकारसोबत (Central Government) समन्वयाने काम करून विकासाला गती देणे, रोजगारनिर्मिती वाढविणे आणि राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
बंगळुरातील वाहतूक कोंडी व सिंचन प्रकल्पांवर भर बैठकीदरम्यान विशेषतः बंगळूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या शहरी वाहतूक प्रकल्पांवर चर्चा झाली. तसेच राज्यातील विविध महत्त्वाच्या सिंचन योजनांसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक व प्रशासकीय सहकार्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, डी. के. शिवकुमार यांची काँग्रेसमध्ये संकटमोचन अशी प्रतिमा आहे. आताच्या राज्यसभा अन् विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी पडद्यामागे राहुल गांधी यांच्याबरोबर महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांची राहुल गांधी यांचे खंद्दे समर्थक म्हणून ओळख आहे. मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर, त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने, राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
डी. के. शिवकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, भाजपबरोबर काँग्रेसमधील पक्षांतर्गत असलेल्या विरोधकांना सूचक संदेश देण्यात यशस्वी झाल्याचे, राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आले आहे. या भेटीचे भविष्यात राजकीय काय पडसाद उमटतात, याची आता उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.