Congress Setback : काँग्रेसला मोठा झटका, सत्तेत येण्याचा मार्ग खडतर; सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारी समोर!

Vote Vibe Survey : निवडणूकपूर्वी सर्व्हेनुसार काँग्रेसचा सत्तेत परतण्याचा मार्ग खडतर होताना दिसत आहे. त्यांनी केवळ 27 टक्के मतदारांचा पाठींबा असल्याचे दिसत आहे. तर, त्यांच्या विरोधात लढणाऱ्या पक्षाला 33 टक्के मतदारांची पसंती आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress News : काँग्रेस विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे.एसआयआरच्या विरोधात दिल्लीत शक्तिप्रदर्शन केले. निवडणुकी आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले. मात्र, निवडणुकीत याचा फायदा त्यांना होताना आगामी विधानसभा निवडणुकीत होणार नसल्याचे दिसत आहे.

पुढील वर्षी पंजाब विधानसभा निवडणुका होणार आहे. येथे काँग्रेसला सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, व्होटर वाइबने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये पंजाबमध्ये काँग्रेसचा सत्तेत परतण्याचा मार्ग खडतर असल्याचे दिसत आहे.

सर्व्हेनुसार, आम आदमी पक्षाला तब्बल 33.5 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला 27.6 टक्के मते मिळणार आहे. तर, भाजपला 14 टक्के आणि अकाली दलला 12.5 टक्के मतं मिळत असल्याचे दिसत आहे. वारिस पंजाब दे या पक्षाला देखील 8 टक्के मत मिळत असल्याचे दिसत आहे.

अकाली दल आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ते एकत्र आले तर त्यांच्या मतांची टक्केवारी देखील 28 होईल, अशा वेळी काँग्रेसला ही निवडणूक आणखी अवघड जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या कोण आघाडीवर?

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आपचे विद्यमान आमदार भगवंत मान हे आघाडीवर दिसत आहेत. सर्व्हेत त्यांनी 35.9 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर, काँग्रेस मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले नाही. मात्र, त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांना 19 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. अकाली दलाचे सुखबीर बादल यांना 14.6 टक्के लोकांची पसंती आहे.

Rahul Gandhi
Congress Shiv Sena News : शिवसेना आमदाराचा डाव काँग्रेस नेत्यानं उलटवला? श्रीकांत शिंदेंच्या उपस्थित झालेला पक्षप्रवेश दिशाभूल करणारा, दुर्राणींचा मोठा दावा

महिला मतदार 'आप' सोबत

काँग्रेस आणि 'आप'मध्ये सहा टक्के मतांचा फरक आहे. या फरकाचे मुख्य कारण महिला मतदार असल्याचे समोर येत आहे. महिला मतदारांसाठी आप सरकारने राबवलेल्या वेगवेगळ्या योजनांमुळे पुन्हा एकदा महिला मतदार आपसोबत जाताना दिसत आहेत. शिवाय ही निवडणुकीत चार पक्ष मैदानात असल्याने विरोधी मतं देखील विभागाताना दिसून येत आहे. त्याचा थेट फायदा सत्ताधारी आपला होतो आहे.

Rahul Gandhi
BJP Vs Shivsena : अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका; अंधारेंचा पलटवार, ‘तुमचं आणि दादांचं कनेक्शन फक्त ७० हजार कोटींचं!’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.