ग्वाल्हेर : मागील वर्षी भाजप सोडून काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झालेले आमदार सतीश सिकरवार (Satish Sikarwar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोमवारी त्यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचे पाय धरल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने ते पुन्हा भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर रात्री झालेल्या एका कार्यक्रमात मात्र सिकरवार यांची खुर्ची न मिळाल्याने फजिती झाली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
शिंदे हे रविवारी ग्वाल्हेरमध्ये कार्यक्रमानिमित्त आले होते. या कार्यक्रमात ग्वाल्हेरचे आमदार असलेले सिकरवारही निमंत्रित होते. ते व्यासपीठावर आल्यानंतर थेट शिंदे यांचा त्यांनी पाय धरला. त्यावरून त्यांच्या भाजप प्रवेशाची राजकीय चर्चा सुरू झाली. शिंदे यांनी त्यांचे व्यासपीठावर स्वागत केले. त्यानंतर रविवारी रात्रीच अखिल भारतीय तानसेन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सिकरवार यांनाही बोलावण्यात आले होते. पण ते व्यासपीठावर पोहचले तेव्हा पहिल्या रांगेत एकही खुर्ची रिकामी नव्हती. त्यामुळे ते खुर्ची शोधत होते. पण खुर्ची न मिळाल्याने ते व्यासपीठावरून जाऊ लागले. यावेळी आयोजकांनी त्यांना थांबवून मागील रांगेत बसण्याची विनंती केली. पण आपली फजिती झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिकरवार तिथून लगेच निघून गेले.
आयोजकांना आपली चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यासाठी पहिल्या रांगेत खुर्ची आणण्यात आली. त्यानंतर काही वेळाने सिकरवार व्यासपीठावर आले आणि खुर्चीवर बसले. व्यासपीठावर उपस्थित खासदार व आयोजकांना त्यांची मनधरणी करावी लागली. पण त्यांच्या झालेल्या फजितीची चर्चा कार्यक्रमात जोरदार रंगली होती.
सिकरवार हे 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये होते. ग्वाल्हेर पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपने तिकीट दिले होते. पण या निवणुकीत काँग्रेसचे उमेदवार मुन्ना लाल गोयल यांनी त्यांचा पराभव केला. 2020 मध्ये गोयल हे शिंदे यांच्यासोबत भाजपमध्ये केले. त्याचवेळी सिकरवार हे भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल होत तिकीट मिळवले. सिकरवार यांनी पोटनिवडणुकीत गोयल यांचा पराभव केला. आता ते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.